Tuesday, April 16, 2024

Latest Posts

आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगलीमधील जत आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यांचा आज पहाटे मृत्यू झाला.

सांगलीमधील जत आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यांचा आज पहाटे मृत्यू झाला. त्यांच्यावर हजारोच्या उपस्थितीमध्ये अनिल बाबर यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. अनिल बाबर यांना न्यूमोनिया झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांनी आमदार अनिल बाबर यांच्या कुटुबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या निधनामुळे विटा खानापूर-आटपाडी मतदार संघावर शोककळा पसरली आहे.

आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. त्यानंतर विटा शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. बाबर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गार्डीमध्ये जीवन प्रबोधिनीच्या मैदानावर बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बाबर यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार विश्वजित कदम हे सर्व नेते उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल बाबर यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, कमी बोलून साधी राहणी असे अनिल बाबर यांचे व्यक्तीमत्व होते. राज्यात कुठे ही गेलो तरी अनिल भाऊंची माणसे भेटायची. त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केले. अनेक संस्था उभा केल्या. सर्वसामान्य माणूस कसा असतो हे दाखवून दिले. निवडणूक येताच अनेक परकाष्ठ कराव्या लागतात, पण लोकांनी त्यांना निवडून दिले. या लोकांच्या ऋण फिटणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. अनिल बाबर यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जायचे. पाण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले होतेम्हणून त्यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जायचे.

हे ही वाचा:

बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकीचा चाहता अडचणीत,FRI दाखल,नेमंक घडलं काय?

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss