Monday, May 20, 2024

Latest Posts

लहान मुलांची विक्री करणारी टोळी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

ज्या नागरिकांना मुले नाहीत, त्यांना चोरलेली लहान मुले विकायची हे काम या टोळीकडून केले जात होते. एक ते दीड वर्षांच्या मुलाला विकण्यासाठी ही टोळी तब्बल २ लाख रुपये घेत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये २३ वर्षीय नुरमोहम्मद सय्यद, १९ वर्षीय आदिल शेख खान, २६ वर्षीय तौफिर इकबाल सय्यद, २५ वर्षीय रझा अस्लम शेख, २६ वर्षीय इरफान फुरखान खान आणि समाधान जगताप या आरोपींचा समावेश आहे.

लहान मुलांना चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. या टोळीला  मालवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून अटक करण्यात आले आहे. कुरार पोलीस या प्रकरणाचा छडा लावत असून या टोळीत एकूण किती जणांचा समावेश आहे? या टोळीने किती लहान मुलांना पळवले आहे? याचा शोध घेत आहेत.

ज्या नागरिकांना मुले नाहीत, त्यांना चोरलेली लहान मुले विकायची हे काम या टोळीकडून केले जात होते. एक ते दीड वर्षांच्या मुलाला विकण्यासाठी ही टोळी तब्बल २ लाख रुपये घेत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये २३ वर्षीय नुरमोहम्मद सय्यद, १९ वर्षीय आदिल शेख खान, २६ वर्षीय तौफिर इकबाल सय्यद, २५ वर्षीय रझा अस्लम शेख, २६ वर्षीय इरफान फुरखान खान आणि समाधान जगताप या आरोपींचा समावेश आहे.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणींशी ओळख करून त्यांना लग्नाच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढायचं आणि फसवायचं असं ही टोळी करायची.

हे ही वाचा: 

ललित पाटीलला ‘त्यांचा’ पाठिंबा; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

आरोप खोटे ठरल्यास मानहानीचा दावा करु; दादा भुसेंचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss