Tuesday, April 23, 2024

Latest Posts

शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू वर १० दिवसांत तब्ब्ल ६१ लाखांचा टोल जमा

नुकतंच अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे (Shivdi Nhava Sheva Atal Setu) उदघाटन हे करण्यात आले आहे.

नुकतंच अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे (Shivdi Nhava Sheva Atal Setu) उदघाटन हे करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातल्या उरण-अलिबागसह कोकणात किंवा पुण्यामार्गे दूरचा प्रवास करण्यासाठी हा मार्ग अतिशय सोयीस्कर सध्या पडत आहे. तर मुंबईकरांची या मार्गाला मोठी पसंती सध्या मिळत आहे.

नुकतंच मुंबईतील शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे उदघाटन हे झाले आहे. या मरगळ मुंबईतील नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद हा दिला आहे. २१ किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूवरून दररोज तब्बल ३० हजार वाहनं ये-जा करत आहेत. त्यामुळं गेल्या १० दिवसांची आकडेवारी पाहता टोलच्या माध्यमातून तब्बल ६१ लाख ५० हजार रुपयांचा महसूल एमएमआरडीएला मिळाला आहे.

शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा एक गेमचेंजर प्रकल्प आहे. दक्षिण मुंबईला थेट रायगड जिल्ह्याशी जोडणारा कनेक्टर आहे. देशातल्या सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचं लोकार्पण १२ जानेवारीला झाले. या पुलावरून प्रवास करण्यासाठी टोल भरावा लागतो. शिवडी न्हावाशेवा पुलासाठी २५० रूपये टोल आकारण्यात येतो. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाचा खर्च २१ हजार २०० कोटींवर गेलाय. सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.लांबीच्या निकषाने जगातील दहाव्या क्रमांकाचा हा सागरी सेतू आहे. संपूर्ण देशातील सर्वाधिक लांबीचा हा सागरी सेतू आहे.

 

राज्य सरकारनं एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं मुंबई ते पनवेल हे प्रवासाचं अंतर कमी झालं आहे. मुंबईतून नवी मुंबईमार्गे पनवेलपर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा दीड-दोन तासांचा वेळ आता केवळ पंधरा मिनिटांवर आला आहे. त्यामुळं वाहनचालक आणि मालकांकडून दूरवरच्या प्रवासासाठी या सेतूचा वापर वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत या सागरी सेतूवरून येजा करणाऱ्या वाहनांची दैनंदिन संख्या ३० हजारांवरून ७० हजारांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे.

 

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

सिद्धार्थ जाधव,भूषण प्रधान आणि मयुरी देशमुखच्या ‘लग्नकल्लोळ’चे धमाकेदार टिझर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss