Sunday, May 19, 2024

Latest Posts

लोअर परेलमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळली

मुंबईमधील लोअर परेलमध्ये (Lower Parel) लिफ्ट कोसळल्याची भयानक घटना घडली आहे. ही घटना सेनापती बापट मार्ग कमला मिल इथल्या ट्रेड वर्ल्ड इथे घडली आहे.

मुंबईमधील लोअर परेलमध्ये (Lower Parel) लिफ्ट कोसळल्याची भयानक घटना घडली आहे. ही घटना सेनापती बापट मार्ग कमला मिल इथल्या ट्रेड वर्ल्ड इथे घडली आहे. लोअर परेलमधील सोळा मजल्याच्या चौथ्या माळ्यावरून ही लिफ्ट खाली कोसळली आहे. या लिफ्टमध्ये एक दोन व्यक्ती नसून या लिफ्टमध्ये एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या ग्लोबल आणि केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. लिफ्टमध्ये जखमी झालेले सर्व व्यक्तींची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर जखमी झालं नाही अशी माहिती देण्यात आली आहे.

लोअर परेलमध्ये ही घटना सकाळी १० वाजून ४९ मिनिटांनी घडली आहे. ट्रेड वर्ल्डमधील सी विंगमधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तळमजल्यावर लिफ्ट कोसळली. यामध्ये ८-९ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सुरक्षा पर्सनलद्वारे सुटका करण्यात आली आणि आता त्यापैकी ८ जखमींना ग्लोबल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे तर एका जखमीला केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. इतर चार किरकोळ रुग्णालयामध्ये दाखल होण्यास नकार दिला आहे.

लिफ्ट कोसळल्यामुळे झालेल्या जखमींची नावे –

प्रियंका चव्हाण (वय २६ वर्षे), प्रतीक शिंदे (वय २६ वर्षे), अमित शिंदे (वय २५ वर्षे), मोहम्मद. रशीद (वय २१ वर्षे), प्रियांका पाटील (वय २८ वर्ष), सुधीर सहारे (वय २९ वर्षे), मयूर गोरे (वय २८ वर्षे), तृप्ती कुबल (वय ४६ वर्षे) अशी जखमींची नावं आहे या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ग्लोबल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर किरण विश्वनाथ चौकेकर (वय ४८ वर्षे) या जखमीला केईएम रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा:

Subhedar, स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा येणार २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला

Khupte Tithe Gupte नव्या प्रोमोने वेधले लक्ष, ‘हा’ नेता देणार सडेतोड उत्तरं

Weather Update, २३ जून नंतर राज्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss