Sunday, May 19, 2024

Latest Posts

२६/११ च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य

आज २६/११. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भळभळत्या जखमांच्या स्मृतींचा दिवस.

आज २६/११. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भळभळत्या जखमांच्या स्मृतींचा दिवस. याचपार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखात ईशान्येकडील हिंसाचारावर (Northeast Violence) भाष्य करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही सध्या वातावरण पेटलेलेच आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आगलावेपणा आणि महाराष्ट्रातील मिंधे सरकारची बोटचेपी भूमिका यामुळे मराठी सीमाबांधव आणि महाराष्ट्रातील मराठीप्रेमी जनतेत तीव्र संतापाची भावना आहे. हेच तिकडे आसाम आणि मेघालयासह संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानातही घडत आहे. मागील काही वर्षांतील आसाम राज्याचे आक्रमक धोरण ईशान्येतील सीमावादासंदर्भात वादग्रस्त ठरले आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

“ईशान्य हिंदुस्थान आधीच वेगवेगळय़ा कारणांमुळे अशांत आहे. त्यात तेथील सीमावादांचे ‘ज्वालामुखी ‘ धगधगत राहिले तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकच घातक ठरेल . ईशान्येचा विकास आपल्याच राजवटीत झाला , तेथील शांततेसाठी जेवढे प्रयत्न मागील सात – आठ वर्षांत झाले तेवढे पूर्वी झाले नाहीत, असा दावा केंद्रातील विद्यमान सरकार नेहमीच करीत असते . आसाम आणि मेघालय सीमेवर मंगळवारी झालेल्या हिंसाचाराने या फुग्याला टाचणी लावली आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

“गेल्या वर्षी आसाम-मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यात आसाम पोलिसांचे सहा जवान ठार झाले होते. आता आसाम-मेघालय सीमावादाचा हिंसक उद्रेक झाला आणि आसामच्या एका वन कर्मचाऱ्यासह सहा नागरिकांचा बळी गेला. आसाम आणि मेघालय यांच्यातील १२ पैकी ६ वादग्रस्त मुद्दय़ांवर परस्पर समझोता होऊनही आणि उर्वरित मुद्दय़ांबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असूनही मंगळवारचा रक्तरंजित हिंसाचार कसा घडला? तो घडला की घडवला गेला? गोळीबार आवश्यक होता की अनावश्यक?”, असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

 

हे ही वाचा:

Eknath Shinde : शिंदे गटाच्या आमदारांसह खासदार मुंबई विमानतळावर दाखल

Breakfast Recipe: नाश्त्यात सध्या अंड्याऐवजी बनवा चविष्ट Egg Cup, मुलंही चवीने खातील

हिवाळयात निरोगी राहण्यासाठी तुम्ही ‘ या ‘ गोष्टीचा करा वापर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss