Saturday, July 27, 2024

Latest Posts

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या सविस्तर

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील तसेच राज्यातील मोठं मोठ्या व्यक्तींना धमकीचे फोन हे येत आहेत. इतकंच काय तर बई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुममध्ये येणारे धमक्यांचे फोन काही थांबण्याचं नाव घेईनात.

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील तसेच राज्यातील मोठं मोठ्या व्यक्तींना धमकीचे फोन हे येत आहेत. इतकंच काय तर बई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुममध्ये येणारे धमक्यांचे फोन काही थांबण्याचं नाव घेईनात. अगदी त्या कॉल्स मध्ये मुंबई उडवण्याची देखील धमकी ही असतेच. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा (Mumbai Police Control Room) फोन पुन्हा एकदा खणाणला. परंतु आता या मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये थेट टाटा समूहाचे (Tata Group) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांच्या संदर्भात धमकीचा कॉल आला आहे.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा फोन खणाणला. हा फोन टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबाबत होता. रतन टाटांच्या नावाने धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला होता. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं रतन टाटा यांचं नाव घेऊन धमकी दिली. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा ते सायरस मिस्त्री होतील, असं फोन करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कॉलरचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीनं आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीनं कॉलरचा शोध घेतला असता, त्याचं लोकेशन कर्नाटक असल्याचं समजलं. त्यानंतर धमकी देणाऱ्याचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुण्याचा रहिवासी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ पुण्यातील (Pune News) घरी धडक दिली. त्यावेळी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. धमकीचा फोन करणारी व्यक्ती गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आली. तसेच, सदर व्यक्तीच्या पत्नीनं यासंदर्भातील तक्रार पोलिसांत केल्याचंही समोर आलं.

 

फोन आल्यानंतर पोलीस कंट्रोल रूममध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं वेगानं फिरवली आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोध घेतला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या, त्याच्या चौकशीत सदर व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे. धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस पूर्ण अलर्ट मोडमध्ये आले. तात्काळ तपासाची सूत्रं हलवण्यात आली. एका पथकाला रतन टाटा यांच्या सुरक्षेती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर दुसऱ्या पथकाला धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हे ही वाचा:

‘फायटर’ चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित

अपात्र आमदार निकालासाठी राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss