Sunday, May 19, 2024

Latest Posts

DR. BABASAHEB AMBEDKAR महापरिनिर्वाणदिनी मुंबई उपनगरातील शासकीय कार्यालय राहणार बंद

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR B.R. AMBEDKAR) यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर (6 DECEMBER) रोजी मुंबईतील चैत्यभूमी (MUMBAI CHAITYABHUMI) याठिकाणी केला जातो. यादिवशी प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षी सुद्धा चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सर्व अनुयायांना चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणे शक्य व्हावे, यासाठी मुंबईत ६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (VARSHA GAIKWAD) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येतात. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचप्रमाणे निर्भया  पथक, आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास मदतकार्य, प्रथमोपचाराचे साहित्य, राहण्याची सोय तसेच जेवणाची सुविधा शिवाजी पार्क परिसरात करण्यात आली आहे. तसेच, देशभरातून येणाऱ्या लाखो भीम अनुयायांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल गाड्यांची सोय करण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, यादिवशी सर्व कार्यालये सुरु असल्यामुळे अनेक अनुयायांना महामानवाला अभिवादन करणे शक्य होत नाही. राज्यातील अनेक संघटना याच पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांपासून सुट्टी मिळावी, अशी मागणी करत होते. त्यात ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समन्वय समितीने मुबंईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, याबाबत शासनाकडे शिफारस केली होती. वर्षा गायकवाड यांच्या मागणीला आता यश आले आहे. 

मध्य रेल्वेने दि. ६.१२.२०२३ रोजी सुरू होणार्‍या ट्रेन क्रमांक ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -आदिलाबाद एक्स्प्रेसचा प्रवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या फायद्यासाठी १ सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह वाढवण्याचा निर्णय देखील घेतला आहे. विशेष गाड्यांची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास सुखकर करावा तसेच प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

 नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा ‘फ्रेम’, पत्रकारांच्या जगण्यावर भाष्य करणारा सिनेमा

एका माशानं रातोरात बनवलं करोडपती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss