spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रालयात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन, वर्धा धरणग्रस्तांनी केले असे…

मंत्रालयात (ministry) आज अचानक मोठा गोंधळ उडताना बघायला मिळाला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर जाळी लावण्यात आली आहे.

मंत्रालयात (ministry) आज अचानक मोठा गोंधळ उडताना बघायला मिळाला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर जाळी लावण्यात आली आहे. कुणीही उडी मारुन आत्महत्या करु नये, सुरक्षेच्या कारणास्त ही जाळी बांधण्यात आली आहे. याच जाळीवर उडी मारुन काही शेतकऱ्यांनी आंदोलन (protest) केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे आंदोलन करणारे आंदोलक हे अप्पर वर्धा धरणग्रस्त (Upper Wardha dam affected) आहेत. आपल्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आज थेट मंत्रालय गाठलं आणि जाळीवर उतरून आंदोलन पुकारलं. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, असा आरोप आंदोलकांचा आहे.

अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या मोर्शी येथे अप्पर वर्धा धरण (Upper Wardha Dam) आहे. या धरण परिसरातील धरणग्रस्तांकडून आज थेट मंत्रालयात आंदोलन करण्यात आलं. या धरणग्रस्तांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. गेल्या १०३ दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर या सर्व धरणग्रस्तांचं आंदोलन सुरु आहे. पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यांना अजूनपर्यंत न्याय देण्यात आला नाही, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी आज थेट मंत्रालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरु केलं. विशेष म्हणजे मंत्रालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. ते विविध बैठका आणि आपल्या कामांमध्ये व्यस्त आहेत. असं असताना आज मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी वेगळ्याच पद्धतीने आंदोलन पुकारलं. त्यांनी आधी मंत्रालयात प्रवेश घेतला. त्यानंतर जाळीवर चढून निदर्शने देण्यास सुरुवात केली. यावेळी या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.

आंदोलकांची संख्या ही जवळपास ५० इतकी आहे. त्यांनी विझिटर (visitor) म्हणून मंत्रालयाचा पास मिळवला. त्यानंतर पहिल्या मजल्यावर जावून सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. आंदोलकांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्यानंतर मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली. आंदोलक नेमके आहेत कोण, ते का तिथे निदर्शने देत आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. नंतर सर्व माहिती समोर आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पण आंदोलकांना जाळीतून बाहेर काढताना पोलिसांना अनेक अडचणी आल्या. आंदोलक आक्रमकपणे घोषणाबाजी करत होते. अखेर पोलिसांनी आंदोलकांची यशस्वीपणे धरपकड केली. अप्पर वर्धा धरणासाठी १९७२ मध्ये जमिनी घेण्यात आल्या होत्या. पण या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात आला नाही. आंदोलक हे स्थानिक आहेत. पण स्थानिकांना प्रकल्पात प्राधान्याने नोकरीत घेण्यात आलं नाही. त्यामुळे या आंदोलकांकडून मोर्शी तहसील कार्यालासमोर आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.

हे ही वाचा: 

‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचा महाराष्ट्रात धुमाकूळ, आतापर्यंतचे सगळे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’

अंधेरीतील शहाजीराजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जलतरण तलाव आजपासुन सुरु…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss