spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

अंधेरीतील शहाजीराजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जलतरण तलाव आजपासुन सुरु…

मुंबई महानगरपालिकेने अंधेरी (पश्चिम) येथे १९८८ मध्ये शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल उभारले.

मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अखत्यारीतील (jurisdiction) बृहन्मुंबई क्रीडा (Brihanmumbai Institute of Sports) आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे चालविण्यात येत असलेला अंधेरीमधील (Andheri) शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव (Swimming pool at Shahjiraje Bhosle Sports Complex) मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ म्हणजेच आजपासून सभासदांसाठी (members) खुला करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव (Reasons for repair) हा तलाव ८ ऑगस्टपासून बंद ठेवण्यात आला होता.

मुंबई महानगरपालिकेने अंधेरी (पश्चिम) येथे १९८८ मध्ये शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल उभारले. या संकुलाचे व्यवस्थापन व परिरक्षण बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक न्यायाकडे सोपविण्यात आले आहे. या संकुलात क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जलतरण तलाव, खुले मैदान असे एकूण ३ महत्त्वाचे विभाग आहेत. त्याचबरोबर या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्यायामशाळा, कार्डिओ व्यायामशाळा, महिलांकरिता विनामूल्य कराटे प्रशिक्षण वर्ग, जिम्नॅस्टिक, स्केटींग, एरोबिक्स, योग, टेनिस, नृत्य, चित्रकला इत्यादी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या दोन्ही तलावांची अभियांत्रिकीय कामे (Engineering works) आणि संबंधित चाचण्या (related tests) करण्यात आल्या असून दोन्ही जलतरण तलाव मंगळवार, २९ ऑगस्टपासून सभासदांसाठी खुले करण्यात येणार आहेत. याच क्रीडा संकुलात असणारा जलतरण तलाव हा ऑलिम्पिक दर्जाचा असून, येथील प्रशिक्षकांनी आजपर्यंत हजारो नागरिकांना पोहण्याची कला अवगत करून दिली आहे. तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू देखील या ठिकाणी केलेल्या शास्त्रशुद्ध सरावातून तयार झाले आहेत. जलतरण तलावात प्रगत प्रशिक्षण वर्ग, उन्हाळी शिबिर इत्यादीचे आयोजन करण्यात येते. जेवढ्या कालावधीसाठी जलतरण तलाव बंद होता, तेवढा कालावधी सभासदांना वाढवून देण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा: 

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद…

भिवंडीतील धक्कादायक घटना आली समोर, ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि बेदम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss