Tuesday, May 21, 2024

Latest Posts

मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन, लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग (SEEID), व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड येथे मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन आयुक्त निधी चौधरी यांच्या हस्ते झाले. मुलुंड (आय.टी.आय.) येथे सुरू झालेला लाइटहाऊस प्रकल्प दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. कोणत्याही पदवीबरोबरच जागतिक बाजारपेठेत आवश्यक कौशल्य विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हा फाऊंडेशन कोर्स आधुनिक काळातील कौशल्य विकासासाठी महत्वाची भूमिका बजावेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी सांगितले.

आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या, युवक आणि युवतींना स्पोकन इंग्लिश आणि डिजिटल साक्षरता अशा प्रकारचे प्रशिक्षण लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही २१ व्या शतकातील आवश्यक आणि गरजेची कौशल्ये आहेत. केवळ रोजगार देण्याऐवजी हा कार्यक्रम तरुणांना नोकरीत राहण्यास आणि करिअर घडविण्यास सक्षम करतो.
शेफाली शिरसेकर आणि वैभव कोल्हे यांनी प्रस्ताविक केले. लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुलेकर यांनी आभार मानले.

लाइटहाउसच्या माध्यमातून रोजगार क्षमता वाढेल

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड येथे हा प्रकल्प सुरु झाला आहे. लाइटहाऊस प्रकल्प आय.टी.आय, मुलुंड येथे ३००० चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात आलेला आहे. यामध्ये विविध वर्ग खोल्या तयार करण्यात केल्या आहेत. यामध्ये, खजाना, कट्टा, टेक- हब आणि क्लासरूम असून या प्रकल्पामार्फत युवकांना विविध कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास विकासावर भर देण्यात येतो. मुलुंड लाइटहाऊसमध्ये कमी उत्पन्न समुदायातील १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक आणि युवतींना माहिती, करिअर समुपदेशन, व्यावसायिक कौशल्ये देण्यात येत असून, नोकरी मिळवण्यासाठी आणि नंतरचेही सहकार्य करण्यात येत आहे. याद्वारे त्यांना उपजीविका करता येईल. व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमांची रचना करताना उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा समावेश केला जाईल. ज्यामुळे तरुणांची रोजगारक्षमता वाढेल. लाइटहाऊस कार्यक्रम हा भारतामध्ये ४ राज्यांमध्ये आणि १० शहरांमध्ये सुरू आहे. लाइटहाउस प्रकल्प हा सार्वजनिक खासगी भागिदारी (PPP) द्वारे चालवले जातात. ज्यामध्ये सरकारी संस्था, कॉर्पोरेट्स, सामाजिक संस्था आणि नागरिक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदलासाठी काम करतात.

यावेळी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाचे संचालक योगेश पाटील, लाइटहाऊस कम्युनिटीजचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन, इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेडचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी पी. डी. मुंद्रा, लाइटहाऊस कम्युनिटीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर उपस्थित होते.

हे ही वाचा:

शिवसंकल्प यात्रेच्या राजापुरमधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात;आंबा, काजू पिकाला मुसळधार पावसाचा फटका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss