Sunday, May 19, 2024

Latest Posts

Measles Disease : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवरनं बालकाचा मृत्यू

मुंबईत (Mumbai News) सलग तिसऱ्या दिवशी गोवर संसर्गानं (Measles Disease) एका बालकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीमधील एका ८ महिन्यांच्या बालकाला अंगावर पुरळ येऊन ताप येत होता.

मुंबईत (Mumbai News) सलग तिसऱ्या दिवशी गोवर संसर्गानं (Measles Disease) एका बालकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीमधील एका ८ महिन्यांच्या बालकाला अंगावर पुरळ येऊन ताप येत होता. त्या बालकाचा काल मृत्यू झाला. या मृत्यूमुळे मुंबई आणि परिसरातील गोवरमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १२ वर पोहोचली आहे. तर २३३ जणांना गोवरचा संसर्ग झाला आहे. मुंबईच्या झोपडपट्टी भागात गोवरच्या संसर्गाचा धुमाकूळ आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ३५ लाख घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भिती असते.

मुंबईत उद्रेक झालेल्या गोवर रुग्णांच्या संख्येने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर औरंगाबाद शहरात गोवर संशयित आढळून आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. ग्रामीण भागातील लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी व लसीकरण करण्यासाठी सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे.

मुंबईपाठोपाठ औरंगाबादमध्येही गोवर संशयित मुलं आढळली आहेत. शहरातील शताब्दीनगर, रहेमानिया कॉलनीत आठवडाभरापासून गोवरची ८ संशयित बालकं आढळून आली आहेत. मुलांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबई येथील हाफकिन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु आहे. मुलांच्या अहवालाकडे आरोग्य विभागाचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा : 

Margashirsha Laxmi Pooja 2022 : श्री महालक्ष्मी व्रताची कथा, कहाणी गुरुवारची …

महाराष्ट्रात कमजोर सरकार आहे, सरकारचे प्रमुख देवधर्म तंत्रमंत्र ज्योतिषात अडकलेत ; राऊतांच्या मुख्यमंत्र्यांना टोला

सलमान खानच्या भाचीचं बॉलीवूड मध्ये पदार्पण, कोण आहे? Alizeh Agnihotri

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss