Sunday, May 12, 2024

Latest Posts

बाबासाहेबांच्या विचारमूल्यांसाठी BJP सरकार घालवा, मुंबईत आंबेडकरवादी, साहित्यिक व विचारवंतांनी केले आवाहन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते व उपाध्यक्ष हुसेन दलवाई (Hussain Dalwai) यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचे वास्तव, देशातील लोकशाही व संविधान समुळ नष्ट करण्यासाठी भाजपा पक्ष उतावीळ झाला आहे अशी चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी, “लोकसभेची ही निवडणुक आपल्या अधिकारांची व अस्मितेची आहे असे मानून नरेंद्र मोदींच्या गॅरंटीचा धोका लक्षात घ्यावा. आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधीजी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार मूल्यांसाठी भाजप सरकार घालविणे हे परमकर्तव्य आहे,” असे आवाहन आंबेडकरवादी, साहित्यिक व विचारवंतांनी केले आहे.

यावेळी बैठकीत उपस्थित लोकांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘सर्वसामान्य जनता म्हणजेच दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक तसेच शेतकरी, कामगार, महिला व बेरोजगार यांच्या मुलभूत हक्कांना पायदळी तुडविले जात आहे. ब्रिटिश साम्राज्यशाही विरुध्द झालेल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतेही योगदान दिले नाहीच परंतु ब्रिटिशांना सहाय्य होईल अशीच भुमिका घेतली ते भाजप व आरएसएसचे सरकार एका हुकूमशहाला जन्माला घालत आहे. एकाधिकारशाही हा त्यांच्या विचार सरणीचा पाया राहिला आहे. युध्दाच्या खाईत घेऊन जाणारा हिटलर हा त्यांचा आदर्श आहे. अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींची गँरेंटी म्हणजे बहुमताच्या जोरावर स्वायत्त असलेल्या न्यायपालिका, निवडणुक आयोग, ईडी, सीबीआय व पोलीस यंत्रणा यांना अंकीत करणे आणि बंधुत्व, समता, न्याय मोडीत काढणे आहे. संवैधानिक असलेले अधिकार धोक्यात आलेले आहेत म्हणजेच सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा, भावना व मागण्यांचा चुराडा करणे होय.’

या बैठकीला माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, तुषार गांधी, रामदास भटकल, साहित्यिक अर्जून डांगळे, मधु मोहिते, प्रकाश सोनावणे, हुस्नबानो खलिपे, सुधाकर सुराडकर, संजय अपरांती, शामदादा गायकवाड, प्रज्ञा पवार यांच्यासह अनेक विचारवंत आणि साहित्यिक उपस्थित होते.

हे ही वाचा:

मुस्लिम समाजासाठी नसीम खान प्रचंड आक्रमक; कॉंग्रेसमध्ये दलाल खुसल्याचा आरोप

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ! कांदा निर्यातबंदी हटवण्याचा घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss