Saturday, May 18, 2024

Latest Posts

मुंबई पोलिसांनी सुरु केलंय धडक कारवाईच All Out Operation

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सवाव असलेल्या लोकसभा निवडणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडाव्या म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष आयुक्त देवेन भरती यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात Operation All Out चा कार्यक्रम हाती घेतला आहे.

लोकसभा निवडणुकांचा प्रचार तापत असताना त्या शांततेत पार पडाव्या म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडाव्या म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात Operation All Out सुरु करून महानगरातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारा Operation All Out चा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, शहरात ३ मे २०२४ च्या रात्री ११ वाजल्यापासून ते ४ मे दुपारी १.३० पर्यंत हे ऑपरेशन राबवण्यात आले. जेमतेम १५ तासांच्या या ऑपरेशन मध्ये १७५ कारवाया करण्यात आल्या.

मुंबई शहरातील पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, १३ परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, संरक्षण आणि सुरक्षा, ४१ विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रपणे संपूर्ण मुंबई शहरात Operation All Out ची कार्यवाही पार पाडली. मुंबई शहरातील शिवाजीनगर, गोवंडी, जोगेश्वरी, ओशिवरा, वांद्रे, डोंगरी, भायखळा, आग्रीपाडा, कुर्ला, घाटकोपर आणि भांडुप अश्या संवेदनक्षम भागांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या Operation All Out बद्दल माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांवर नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुंबई पोलिसांना धन्यवाद दिले आहे.

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन Operation All Out प्रभावीपणे राबवले. या ऑपरेशन मधून मुंबई पोलिसांनी ८ फरार आरोपींना अटक केली आहे. एकूण ५३ जणांवर अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. एकूण ५ जणांवर अमली पदार्थ खरेदी/विक्री केल्यासंदर्भात अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत अटक करण्यात आली. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण ४९ कारवाया करण्यात आल्या असून २ आरोपीना अटकही करण्यात आली. अवैध दारू विक्री, जुगार अश्या अवैध धंद्यावर २४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यादरम्यान ३० आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई शहराबाहेर तडीपार करण्यात आलेले तसेच मुंबईत विनापरवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने ६२ कारवाया करण्यात आल्या.

याशिवाय, शहरात एकूण २०६ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यामध्ये २३० आरोपी मिळून आले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १११ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यामध्ये २२४० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. ७७ वाहनचालकांवर ड्रिंक अँड ड्राइव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा:

Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे

Avinash Jadhav यांच्याविरोधात खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss