Saturday, May 18, 2024

Latest Posts

Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसवर (Congress) घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसचा न्यायाशी काहीही संबंध नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काँग्रेस सरकारच्या अंतर्गत तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणाची (Rohit Vemula) फाईल बंद केल्याने देशभरात गदारोळ उठला आहे. अनेक दलित संघटना, विद्यार्थी संघटना यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. अश्यातच, प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधीकृत ‘X’ अकाऊंटवरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर ‘काँग्रेसचा न्यायाशी काहीही संबंध नाही’ अश्या आशयाचा फोटो पोस्ट केला. त्याचबरोबर ते म्हणाले, “तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये, रोहित वेमुला हा दलित नव्हता, असे म्हंटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत तेलंगणा पोलीस येतात.” रोहित वेमुलासाठी काँग्रेसचा वेगळा न्याय असल्याचे सांगून त्यांनी रेकॉर्ड्समधील पुढील मुद्दे मांडले. आपली “खरी जातीय ओळख” शोधून काढेल या भीतीने रोहितने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येसाठी दबाव टाकण्यात आलेले कोणतेही तथ्य किंवा परिस्थिती रेकॉर्डवर उपलब्ध नाही. त्याच्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. तपास अधिकाऱ्यांनी रोहीतची आई राधिका वेमुला यांना विचारले की त्या त्यांची जात निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यास इच्छुक आहेत का?

काँग्रेस न्यायाची अशी व्याख्या करते का? असे ते पुढे म्हणाले. तसेच, काँग्रेसवर टीका करत ते पुढे म्हणाले, “रोहितच्या आई, बहीण आणि भावासाठी हा तुमचा न्याय आहे का? शैक्षणिक संस्थांमध्ये दर मिनिटाला भेदभाव आणि छळ करणाऱ्या एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी हा तुमचा न्याय आहे का? हा तुमचा दलितांचा न्याय आहे का? काँग्रेसला माझा सल्ला आहे कि, जर तुम्हाला त्याचा अर्थ काय हे माहित नसेल तर न्याय हा शब्द वापरणे बंद करा, न्याय ही क्षुल्लक संज्ञा नाही! काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा.”

तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी राहुल गांधी आणि रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांचा ‘भारत जोडो यात्रा’ दरम्यानचा गळाभेटीचा फोटो पोस्ट करत म्हंटले, “हे दलित, आदिवासी, मुस्लिम वरील प्रेम सर्व खोटं आहे. त्यांना फक्त आपली मते हवी आहेत अजून काही नाही. आता सांगा काँग्रेस भाजप-आरएसएस पेक्षा कसे वेगळे आहे?”

हे ही वाचा:

माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही, Kalyan Kale यांची Raosaheb Danve यांच्यावर टीका

ही गल्लीची निवडणूक नाही, दिल्लीची निवडणूक आहे; फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss