Monday, May 20, 2024

Latest Posts

MUMBAI: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची वर्दळ, हिवाळ्यात पावसाची रिमझिम

मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडी जाणवू लागली असताना शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु झाला. हवामान विभागाने २५ ते २६ नोव्हेंबर दरम्यान या अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील अनेक भागांतही शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु झाला. मुंबईत आलेल्या या पावसामुळे हवेतील प्रदूषण कमी होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून पाऊस पडला. वसई, विरार, नालासोपारा परिसरात या भागांत पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे हवामान विभागाने रविवारी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. अजून दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्रीय सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कल्याणमध्ये विजांच्या कडकडासह रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. यामुळे रविवारी पहाटे कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने राज्यभरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. मुंबईतील अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात मध्यरात्री पासून रिमझिम पाऊस सुरू आहे. शहापूरमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांनी खळ्यांमध्येसाठून ठेवलेल्या भाताचा पाऊसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा याठिकाणी सुद्धा पावसाची वर्दळ पाहायला मिळाली.

हे ही वाचा:

MMRDA बैठकीत खासदार DR. SHRIKANT SHINDE यांच्या मागणीला यश

MAHARASHTRA: IRCTC वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss