मुंबईकरांना महागाईचा करावा लागणार सामना, १६ जून पासून पाणी देखील होणार महाग

सध्या महागाई ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आधीपासूनच महागाईचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकरांना (Mumbai) आता महागाईची (Inflation) आणखी जास्त झळ ही बसणार आहे.

मुंबईकरांना महागाईचा करावा लागणार सामना, १६ जून पासून पाणी देखील होणार महाग

सध्या महागाई ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आधीपासूनच महागाईचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकरांना (Mumbai) आता महागाईची (Inflation) आणखी जास्त झळ ही बसणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईच्या पाणीपट्टीत ६ ते ७ टक्के वाढ (Mumbai Water Price) होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री ही बसणार आहे.

येत्या १६ जून २०२३ पासून मुंबईकरांचं पाणी हे महाग होणार आहे. तसेच पाणीपट्टी दरवाढीचा हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे (BMC Commissioner) अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. सध्या महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच दरवर्षी ८ टक्क्यांनी वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने याआधीच प्रशासनाला दिला आहे. राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा (Upper Vaitarna ) आणि भातसा तलावातून (Bhatsa) उपसण्यात येणाऱ्या पाण्यासाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या आस्थापना खर्चात होत वाढ होत आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून मुंबईची पाणीपट्टी ६ ते ७ टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रति हजार लीटर मागे २५ पैसे ते ४ रुपयांची दरवाढ होणार आहे. जलवाहिन्याच्या कामासाठी सोमवारी दिनांक ५ जून २०२३ रोजी अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ येथील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version