Friday, May 17, 2024

Latest Posts

Naresh Mhaske यांच्या उमेदवारीवरून BJP कार्यकर्ते आक्रमक

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या (Thane Loksabha Constituency) जागेवरून आता महायुतीमध्ये (Mahayuti) चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेच्या नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबईमधील भाजप (BJP) कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘गणेश नाईक साहेब तुम आगे बढो’, ‘संजीव नाईक साहेब तुम आगे बढो’ अश्या घोषणा देत नाईक समर्थक ठाण्याच्या जागेवरुण आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यातच आज भाजपची एक बैठक बोलावण्यात आली होती. याबाबत बोलताना भाजपच्या संदीप नाईक (Sandip Naik) यांनी तटस्थ भूमिका घेत ‘कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु,’ असे वक्तव्य केले आहे.

संदीप नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले कि, “आजची बैठक झाली ती सर्वांनी मिळून महायुतीचा प्रचार करावा यासाठी झाली. भाजपचे नवी मुंबईत जास्त प्राधान्य आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेतच, एक अपक्ष आमदार आहे त्यांचा भाजपला पाठिंबा आहे. नवी मुंबईत भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार हा एकत्रित करायचा आहे. उमेदवार जाहीर झाला की त्या दिवसापुरती कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी असू शकते परंतु दुसऱ्या क्षणाला महाराष्ट्रातून चांगला निकाल लागावा, किमान ४५ जागा निवडूण याव्यात यासाठी प्रत्येकाने एकत्र येत प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु. नवी मुंबईतील वातावरण सकरात्मक आहे. आमचे सर्वांचे ध्येय एकच आहे की नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे.”

भाजप कार्यकर्ते आणि नवी मुंबई महानगरपालीकेचे माजी सभापती रवींद्र इथापे यांनी आक्रमक होत सांगितले, “नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने सर्वत्र नाराजी आहे, जोपर्यंत पक्ष भूमिका घेत नाही तोपर्यंत महायुतीच काम करणार नाही. हा प्रश्न आमचा वैयक्तिक नाही, संजीव नाईक जेव्हा खासदार होते तेव्हापासून अनेक प्रश्न त्यांनी मार्गेी लावले आहेत. संजीव नाईक हे ४०० पार मध्ये बसेल तेव्हाच विकास होईल, त्यांनी अनेक काम केले आहेत. ४ आमदार आमचे आहेत, नगरसेवक आमचे तरी आम्हाला उमेदवारी दिली नाही. अनेक काम ही संजीव नाईक यांनी केलेली आहेत. ठाणेवाल्यांना नवी मुंबईची उन्नती बघवत नाही त्यामुळे ठाण्यातला उमेदवार दिलाय. जसा कल्याणला उबाठाने डमी उमेदवार दिला आहे तसाच उमेदवार ठाण्यात यांनी डमी म्हणून दिला आहे. संजीव नाईक यांना उमेदवारी दिली नाही तर उद्या आम्ही निर्णय घेऊ आणि आमच्याकडून एक उमेदवार देऊ.”

हे ही वाचा:

PM Modi देशासमोरच संकट नसून विरोधकांसमोरच संकट, Devendra Fadnavis यांचे वक्तव्य

संविधानाला संघ आणि मोदींपासून नाही तर विरोधकांपासून धोका, महाराष्ट्र मोदींसोबतच!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss