spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

एनआयएची आयसीसवर मोठी कारवाई, देशभरातील ४४ ठिकाणी एनआयएची धाड

एनआयएने (NIA) आयसीसवर मोठी कारवाई केली आहे. देशभरातील ४४ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएने (NIA) आयसीसवर मोठी कारवाई केली आहे. देशभरातील ४४ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे दहशतवादी प्रकरणातील आरोपी (Pune Terrorist Case) शामिल नाचनला आणि अतिफ नाचन यांना पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे. महाराष्ट्र एटीएसच्या (Maharashtra ATS) पथकाच्या मदतीने एनआयएने १३ ते १४ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच आता कर्नाटकमध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला व अतिफ नाचन यांना पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. भिवंडी मधील पडघा गावात एनआयएची मोठी कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहेत. महाराष्ट्र एटीएस विभागाच्या मदतीने एनआयएने १३ ते १४ लोकांना ताब्यात घेतले आहे. पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होता. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतरपडघा गावातील २ जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये दोन ठिकाणी, ठाणे ग्रामीणच्या पडघा इथे ४१ ठिकाणी तर कर्नाटक, बंगलोर ला एक ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. कर्नाटकातही छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे. शाहनवाज नावाच्या अटक आरोपीचा संबंधीत ठिकाणी हि छापेमारी करण्यात आली आहेत.आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी कट रचला आहे. त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये घडण्याची शक्यता आहे. भारतामध्ये ISIS च्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क या तपासात समोर आले आहे.

ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे.

Latest Posts

Don't Miss