Saturday, May 18, 2024

Latest Posts

Narendra Modi In Mumbai, ‘मोदींच मिशन मुंबई’, जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दि १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येणार या पार्श्ववभूमीवर संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत. नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे दुपारी ठीक २. ४५ मिनिटांनी २ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरोळमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातील प्रत्येक मिनिटांची अपडेट जाणून घ्या…

  • दाऊदी बोहरा समाजाने परिवर्तन आणि विकासाच्या कसोटीवर नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे: पंतप्रधान मोदी
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे बोहरा समाजाला उद्देशून सांगितलं की “ते चार पिढी बोहरा समाजाशी जोडलेले आहे. हे सौभाग्य खूप कमी लोकांना मिळत. म्हणून मी सांगतो की या व्हिडिओमध्ये सतत मुख्यमंत्री आणि प्रधान मंत्री आहे मी तर तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. आणि प्रत्येक वेळेस तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून येण्याची जेव्हाही संधी मिळाली आहे माझा आनंद दुप्पट झाला आहे. ” असे पंतप्रधानांनी सांगितलं आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमात सादर झालेल्या व्हिडीओ बद्दलपुढे म्हणाले की ” मी आहे जो व्हिडीओ पहिला त्याबद्दलमला माझी एक तक्रार आहे, माझी इच्छा आहे की यात सुधार व्हायला हवा, त्या व्हिडिओमध्ये सतत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रधानमंत्री बोलले गेले आहे. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे मी इथले नाही पपंतप्रधान आहे नाही मुख्यमंत्री. आणि कदाचित मला जे सौभाग्य मिळाले आहे ते कदाचित भरपूर कमी लोकांना मिळालं असेल. मी चार पिढी या कुटुंबाशी (बोहरा समाज) जोडलेली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषण दरम्यान सांगितल की “मला मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस , अलजेमा-तूस-सैफी संकुलाच्या कार्यक्रमात उपस्थित अन्य सगळे मान्यवर तुम्हा सर्वांमध्ये येणं हे मला कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटत”.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ मिनिटाचा व्हिडिओद्वारे अहवाल सादर करण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाद्वारे देशाला आंबोधित केलं आहे.
  • अंधेरीतील मरोळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहरा मुस्लिम समुदायाचे अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन केले. यावेळी मद्रास बँडकडून मोदींचे स्वागत करण्यात आले.
  • वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंधेरी मरोळ येथील अलजेमा-तूस-सैफी संकुलाच्या उदघाटनाची कार्यक्रमासाठी रवाना झाले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी शुक्रवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठ्या संख्येने जमले होते.
  • वंदे भारत उद्घाटन कार्यक्रमामुळे वेगवेगळ्या गाड्यांच्या वेळेस उशीर झाला, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मालाडमधील कुरार अंडरपास आणि SCLR पुलाचे उद्घाटन केले. मालाडमधील कुरार अंडरपास आणि एससीएलआर पुलाच्या उद्घाटनानिमित्त त्यांनी प्लेगचे अनावरण केले. हे दोन रस्ते प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतले होते.

  • मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दिशेने एलिव्हेटेड कॉरिडॉर हे मोठे पाऊल, पंतप्रधान
  • पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी खुल्या होतात हे अधोरेखित करून मोदी म्हणाले, “गेल्या ९ वर्षांच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीच्या तरतूदीला महत्त्वपूर्ण महत्त्व देण्यात आले आहे.”
  • “या वर्षीच्या अर्थसंकल्पात पगारदार किंवा व्यवसायाने कमावणाऱ्या लोकांचा समावेश असलेल्या मध्यम उत्पन्न गटातील लोक मजबूत करण्यात आले आहेत. मला त्याबद्दल विशेष बोलायचे आहे. पूर्वी मध्यम उत्पन्न गटातील लोक 2 लाख लोकांच्या उत्पन्नावर कर भरत असत, जे आम्ही ७ वर आणले. लाख उत्पन्न. यूपीए सरकारने २० % कर लावला होता. तथापि, आम्ही मध्यम उत्पन्न गटातील लोकांना अधिक मजबूत केले आहे, त्यांच्या हातात अधिक पैसा असेल,” ते पुढे म्हणाले.

  • सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवी झेंडी दाखवली. सीएसएमटी स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्र १७. वरून ट्रेन सुटते. ट्रेनचा प्रवास वेळ ७ तास ५५ मिनिटे असेल. यामुळे प्रवासाचा वेळ १ तास ३० मिनिटांनी वाचेल. या मार्गावरील प्रवासी तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकतात.
  • आज पहिल्यांदा एकत्र २ वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. या ट्रेन मुंबई आणि पुण्यासारख्या दोन आर्थिक शहरांना आपल्या सोबत होतोय. त्यामुळे अनेकांना फायदा होणार आहे. कॉलेज, ऑफीस क्षेत्रातील सर्वासाठी हि सोयीस्कर आहे. असं यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच या मुळे रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

  • तुमच्या आशीर्वादाने सहा महिन्यांपूर्वी सरकार स्थापन झाले, हे सामान्यांचे सरकार आहे, मुख्यमंत्री एकनाश शिंदे
  • महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन केले
  • मुंबईकरांच्या रेल्वे प्रकल्पासाठी दोन हजार कोटींची तरतूद; रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
    वंदे भारत उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मुंबईत पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे कारण राज्याला दोन सेमी हायस्पीड ट्रेन मिळणार आहेत. “शिर्डी आणि सोलापूरला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी या दोन मार्गांवर अशा प्रकारची सेमी हायस्पीड ट्रेन उपलब्ध करून दिली जाऊ शकते, याची कोणीही कल्पना केली नव्हती. ही ट्रेन या पवित्र ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी आहे,” असे फडणवीस म्हणाले. “या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी रेल्वेसाठी १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे आणि मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आभारी आहे,” ते पुढे म्हणाले.
  • मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
  • पंतप्रधान मोदींचा ताफा सीएसएमटीकडे रवाना, या ताफ़्यात जवळपास ३०- ३५ गाडयांचा सहभाग
  • थोड्याच वेळात सीएसएमटी कडे होणार रवाना
  • मोदी ‘आयएनएस शिक्रा’ च्या बेसवर दाखल
  • मोदींच्या स्वागतासाठी राज्यपाल भागात सिंग कोश्यारीसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असाल?

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १० फेब्रुवारी रोजी दुपारी २. १० मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल होतील.पुढे ते मुंबई विमानतळावरून हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावरती येणार आहेत. दुपारी २.४५ वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील.
  • प्लॅटफॉर्म १८ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ मिनिटांसाठी चालत वंदे भारतच्या ट्रेनकडे जाणार आहेत. पुढे ७ मिनिट हे वंदे भारतमध्ये लहान मुलांसोबत गप्पा मारतील.
  • नंतर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. हा सर्व कार्यक्रम साधारणता ३ मिनिटांचा असेल. पुढे त्यांना १ मिनिटांचं यासंदर्भात प्रेसेंटेशन मोदींना दिलं जाईल.
  • पुढे ते प्लॅटफॉर्म १८ वरून वाहनाच्या दिशेने २ मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावरतीदाखल होतील. सीएसएसटी रेल्वे स्थानकात हा साधारणता १५ मिनिटांचा हा कार्यक्रम असेल.
  • पुन्हा ३.५५ ला सीएसटी वरून आयएनएस शिक्रावरती दाखल होतील. पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईविमानतळाच्या दिशेने रवाना होतील. दुपारी ४. २० मिनिटांनी मुंबई विमानतळ दाखल होतील. मुंबई विमानतळ ते मरोळ कारने जाणार आहेत.
  • मरोळ येथील कार्यक्रमाला ४. ३० वाजता पोहचतील. ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसच उद्घाटन होईल. ५. ५० वाजता मरोळहून कारने मुंबई विमानतळावर जाणार आहेत. ६ वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.

हे ही वाचा : 

Narendr Modi In Mumbai , उद्या पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, घ्या जाणून दौऱ्याचं शेड्यूल

Narendr Modi In Mumbai , पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी वाहतुकीत करण्यात आले ‘हे’ बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss