“महाराष्ट्रातील ज्या भागात आज मतदान होत आहेत त्याच भागात काल रात्रीपासून पैशाची देवाणघेवाण झाल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांच्या मदतीने पैशाचं वाटप होत आहे”असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांवर केले आहेत.
आज सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्स अधिकृत अकाऊंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm eknath shinde)यांचा हॅलिकॉप्टर मधून उतरतानाचा व्हिडिओ पोस्ट करत “मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे.”असा आरोप केला.
यासंदर्भात संजय राऊत आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ” पोलिसांच्या मदतीने पैशाचे वाटप होत आहे. दोन तासांसाठी मुख्यमंत्री आले आणि जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत.निवडणूक आयोग आहे का जागेवर? आयोगाचं लक्ष आमच्यावर आहे. ५०० सूट आणि सफारी आणली का? असा प्रश्न विचारत त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या आणि कोणाला वाटत गेले याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच मिडियासमोर आणू. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी याकडे पाहा.”असं म्हणत संजय राऊत (sanjay raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले.
काल १२ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कळवा येथे सभा पार पडली त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली त्यावर “राज ठाकरे सुपारी बाज आहेत. ही पहिली गर्जना भारतीय जनता पार्टीने केली होती. राज ठाकरे सुपारी घेऊन प्रचार करतात किंवा पाठीबा देतात. हे आम्ही कधीच म्हणालो नाही. देवेंद्र फडणवीस(DEVENDRA FADANVIS)यांना अविस्मरणाचा झटका आला असेल.”अशा शब्दात संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हे ही वाचा:
पराभवाच्या भितीनेच Narendra Modi कडून… Bhalchandra Mungekar यांचे ताशेरे
दिघे साहेबांची नक्कल करून अक्कल येत नसते, ४ जूननंतर कळेल ठाणेकर कोणाच्या बाजूने?Rajan Vichare कडाडले
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.