Sunday, May 19, 2024

Latest Posts

‘या’ मुद्यावरुन जनता भाजपचा पराभव करेल, संजय राऊत

भाजपकडून (BJP) वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. राज्यातील उद्योग गुजरातला पळवले जात आहे. या विरोधात सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन राऊत यांनी केलंय .छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati), उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)) असतील महाविकास आघाडी असेल वा संभाजी ब्रिगेड असेल, ज्यांना ज्यांना (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराजांवर श्रद्धा आहे. ज्यांना ज्यांना महाजांचा स्वाभिमान आहे, त्या सर्वांनी या अन्यायाविरोधात एकत्र यावं. महाराजांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाने एकत्र यावं. महाराजांची विटंबना करणाऱ्यांविरोधात एकत्र यावं, असंही राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा : 

Suresh Raina birthday : अवघ्या १९व्या वर्षात क्रिकेट विश्वात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या खेळाडूसाठी आज खास दिवस

शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने राज्यपालांच्या वक्तव्यांच्या विरोधात सातत्यानं आवाज उठवण्याचे काम केलं असल्याचे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे. भाजपकडून शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अपमान केला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जत सोलापूर घेण्याची भाषा होत आहे, या विरोधात आपण सर्वांनी एकत्र यावं असेही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या आसाम नात्याबद्दल संजय राऊत म्हणाले…

मुंबईत आसाम भवनसाठी जागा मागण्यात येत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यात सर्वांना जागा हवी आहे. पण महाराष्ट्राला कोण जागा देणार आहे का? गुजरात उद्योगधंदे पळवत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री (CM EKnath shinde) महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहेत. राज्यातील सरकारला देशात खोके सरकार म्हणून मान्यता मिळाली आहे. खोके सरकारचं आणि आसामचं काय? असा सवाल त्यांनी केला.

जयंत पाटील यांच्या चिरंजीवाचा विवाहनिमित्त, आज शिंदे-फडणवीस आणि ठाकरे आमनेसामने येणार का?

आसामचे मुख्यमंत्री (Chief Minister Himanta Biswa Sarma) मूळचे काँग्रेसचे आहेत. ते पक्षांतर करून भाजपमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदेंनीही तेच केलं. त्यामुळे दोन पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं जुळलं असेल, असा चिमटा काढतानाच नवी मुंबईत आसाम भवन आहे. त्यामुळे मुंबईत आसाम भवनसाठी जागा नाही. मात्र,सांस्कृतिक देवाणघेवाण झाली पाहिजे. या भवनासाठी जागा द्यायची की नाही शेवटी हा निर्णय राज्याने घ्यायचा असतो, असंही ते म्हणाले.

मनसेची आज मुंबईतील नेस्को ग्राउंडवर सभा होणार, राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Latest Posts

Don't Miss