Saturday, July 27, 2024

Latest Posts

लोकलने प्रवास करताय? तर ‘ही’ आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी…

मुंबई लोकल म्हणजेच संपूर्ण मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. मुंबई मध्ये जर कोणाला फिरायचे असेल तर सर्वात आधी आपण मुंबई लोकलचा पर्याय हा निवडतो.

मुंबई लोकल (Mumbai Local) म्हणजेच संपूर्ण मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. मुंबई मध्ये जर कोणाला फिरायचे असेल तर सर्वात आधी आपण मुंबई लोकलचा पर्याय हा निवडतो. स्वस्त आणि वेळ वाचवण्यासाठी हा एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय आहे. तसेच जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. आणि नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. तसेच सध्या मुंबई लोकलमध्ये प्रवाश्यांची गर्दी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच आता लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

आता मुंबई लोकल मध्ये ३० अतिरिक्त लोकल धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेकडून १ हजार ३९४ लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यामाध्यमातून दररोज ३० लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तीन-चार मिनिटांनी लोकल चालवल्या जात असल्याने नव्याने लोकल चालवणं शक्य नव्हते. मात्र सहाव्या मार्गिकेमुळे रेल्वेला नवीन फेऱ्या चालवणे शक्य होणार असल्याने सध्याच्या लोकलमधील गर्दी कमी होऊ शकणार आहे.

 

आता पश्चिम रेल्वेवर लवकरच अतिरिक्त ३० लोकल धावणार आहेत. गोरेगाव ते बोरिवली (Goregaon to Borivali) दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचं काम मेपर्यंत होणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या या मार्गावर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकली जात आहे. या मार्गिकेचे काम एप्रिल-मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. गोरेगाव ते बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेमुळे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान तब्बल २५ ते ३० अतिरिक्त लोकल चालवणं शक्य होणार आहे. नव्या लोकल फेऱ्या वाढणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss