मुस्लिम समाजासाठी नसीम खान प्रचंड आक्रमक; कॉंग्रेसमध्ये दलाल घुसल्याचा आरोप

महाराष्ट्रात ४८ पैकी १७ जागांवर कॉंग्रेस निवडणूक लढवत आहे,मात्र यापैकी एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार देण्यात आलेला नाही. म्हणुन नसीम खान नाराज आहेत.

मुस्लिम समाजासाठी नसीम खान प्रचंड आक्रमक; कॉंग्रेसमध्ये दलाल घुसल्याचा आरोप

Congress कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री नसिम खान(Naseem khan) यांनी पक्षाच्या स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिल्यावर अल्पसंख्य समाजातील वातावरण ढवळून निघाले आहे. कॉंग्रेसने महाराष्ट्रासह सहा प्रमुख राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. मुस्लिमांना आपला तारणहार पक्ष अश्या पध्दतीत निवडणूकीला सामोरा जातोय हे पक्षासाठी मारक आहे असा पवित्रा घेत नसिम खान यांनी कॉंग्रेसला जोर झटका दिला आहे.

महाराष्ट्रात ४८ पैकी १७ जागांवर कॉंग्रेस निवडणूक लढवत आहे,मात्र यापैकी एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व न देता फक्त मतांसाठीच मुस्लिम मतदार हवे असतील तर स्टार प्रचारक म्हणून प्रचार करायचा नाही अशी भूमिका घेत माजी मंत्री नसिम खान यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र पाठवले आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांनी खान यांची त्यांच्या कुर्ला येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी कॉंग्रेस पक्षातील काही ‘दलाल’ पक्षाला संपवण्यासाठी मुस्लिमांना कॉंग्रेस पासून तोडण्याचे काम करत आहे. याविरुध्द आवाज उठवण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे सांगून आपण कुठल्याही दुसऱ्या पक्षात जाणार नसल्याचे नसिम खान यांनी सांगितले.

 ते पुढे म्हणाले, देशातील सहा राज्यात मुस्लिम उमेदवारांना टाळताना हिंदू- मुस्लिम मतविभागणी होईल अशी भिती दाखवण्यात येते, मग अल्पसंख्य समाजाने कॉंग्रेस बरोबर का राहायला पाहिजे असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. नसिम खान यांनी आक्रमक पवित्रा घेताच एमआयएमने त्यांना आपल्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिले. त्याला विनम्रपणे नकार देत आपल्या घरातून आपण अल्पसंख्य समाजाच्या विरोधकांशी लढणार असल्याचे नसिम खान यांनी सांगितले. नसिम खान यांनी विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh)आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या दोन मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलंय. मुंबईतील अल्पसंख्य समाजाचा चेहरा अशी ओळख असलेले नसिम खान यांचा २०१९ मध्ये विधानसभेच्या चांदिवली मतदार संघात ४०९ मतांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासमोर पराभव झाला.

हे ही वाचा:

अयोध्येनंतर महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बिग बींनी खरेदी केली प्रॉपर्टी

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version