Tuesday, May 21, 2024

Latest Posts

शाहू महाराजांनी राजकारणात पडू नये, महाराजांना Congress च्या दावणीला बांधलं.. Rajesh Kshirsagar यांची सडकून टीका

शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी काँग्रेस (Congress) आणि कोल्हापूर येथील राजघराण्यावर टीका करत, ‘काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला आहे,’ असे वक्तव्य केले आहे. कोल्हापूर (Kolhapur) येथे शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील (Satej Patil) आणि कोल्हापूरच्या राजघराण्यावर टीका केली आहे.

यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, “कोल्हापूर छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा, हे आम्हाला कोणीही शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्ही ठेवला आहे. पण काँग्रेसच्या नेत्याने पराभव समोर दिसत असल्याने लोकसभा उमेदवारीची आपल्या गळ्यातील माळ शाहू महाराज यांच्या गळ्यात घातली. काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम केलं आहे. सतेज पाटील घाणेरडे राजकारण करत असतील तर कोल्हापूरची जनता त्यांना माफ करणार नाही. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सभेला येत आहेत म्हणून त्यांचा जळफळाट का होतोय? जय ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या सभा होतात, त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतो.” असा दावा त्यांनी यावेळी केला.

राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, “छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्हीच ठेवला आहे. शाहू महाराजांनी राजकारणात पडू नये, असे आम्हाला वाटते. छत्रपती पद हे सर्वात मोठं पद आहे, पण शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत. शाहू महाराजांचं राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. छत्रपती घराण्याने राजकारणात पडू नये म्हणून याआधी मालोजीराजे आणि संभाजीराजे यांचा कोल्हापूरकरांनी पराभव केला होता. या निवडणुकीत गादिचा अपमान होणार आहे आणि हे करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही.”

हे ही वाचा:

“शिवरायांच्या गादी पुढे मोदी कोणीच नाही”;SANJAY RAUT यांचा PM NARENDRA MODI यांच्यावर निशाणा

PM NARENDRA MODI यांची आज कोल्हापूरात तोफ धडकणार;उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींची सभा 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss