Monday, May 20, 2024

Latest Posts

PM MODI LIVE: मी शाही घराण्यात जन्माला येऊन पीएम झालो नाही…

चंद्रपूर (CHANDRAPUR) येथे विशाल जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन झाल्यावर ‘मोदीजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

देशात गरमीचा पारा वाढला असला तरीही जनता येथे उपस्थित राहिली आहे. जनतेचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरकरांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी भाषांची सुरुवात मराठी भाषेत बोलून केली. त्यांनी यावेळी बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले. समस्त बंधू-भगिनींना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रपूरने राम मंदिरच्या निर्मितीसाठी लाकूड पाठवले होते, याची आठवण बोलतांना नरेंद्र मोदी यांनी काढली. यंदाची निवडणूक स्थिर आणि अस्थिरांमध्ये असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

SHIVSENA कोण वाचवते हे येणारा काळ ठरवेल -VIJAY WADETTIWAR

अखेर MAHAVIKAS AGHADI चा प्रश्न मार्गी लागणार, कधी मिळणार उत्तर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss