Monday, May 20, 2024

Latest Posts

मराठा समाजाच्या पदरात निराशाच: प्रकाश आंबेडकर

सत्तेत बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे. तर, लढणारा मराठा हा रयतेमधला मराठा आहे. त्यामुळे लढणारा मराठा सत्तेत आला पाहिजे. आम्ही जर सत्तेत आलो तर आमच्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपसह इंडिया आघाडीवर आणि सरकारच्या कामावर त्यांनी टीका केली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे. सरकार दिलेला शब्द पाळणार नाही, मराठा समाजाच्या पदरात निराशाच येणार असल्याचं, प्रकाश आंबेडकर यांनी बीडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नाही हे दिसून येत आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित सुरु असल्याची माहिती मला मिळाली आहे. सत्तेत बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे. तर, लढणारा मराठा हा रयतेमधला मराठा आहे. त्यामुळे लढणारा मराठा सत्तेत आला पाहिजे. आम्ही जर सत्तेत आलो तर आमच्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपसह इंडिया आघाडीवर आणि सरकारच्या कामावर त्यांनी टीका केली.

 

इंडिया आघाडी या पक्षाची स्थापना काही पक्षांनी एकत्र येऊन केली आहे, तरीही यादीच्या आघाडीमधील सर्व पक्ष ४ राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत, असं चित्र दाखवलं जात आहे. पण, सरकार बदलून एक वर्ष होऊनही अजून जागा वाटपाबद्दल काही ठोस निर्णय झाला नाही. युती करण्यासाठी आम्हाला पत्रं पाठवली जातात. पण पत्राद्वारे युती केली जात नसते. असे बोलून प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा: 

‘टायगर 3’ मधला सलमान खानचा जबरदस्त लूक

आरोग्य विभागासाठी सरकारची उदासीनता का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss