Saturday, May 18, 2024

Latest Posts

माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही, Kalyan Kale यांची Raosaheb Danve यांच्यावर टीका

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करत आहेत. अश्यातच, जालना लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलाच गरम झाले आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील (Jalana Loksabha Constituency) महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) लढणारे काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे (Dr. Kalyan Kale) यांनी महायुतीचे (Mahayuti) उमेदवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर नाव न घेता टीका केली. “माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत आहोत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही,” अशी टीका त्यांनी केली.

डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, “माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत आहे. यांच्यासारखा चिंधीचोर नाही. मला मॅनेज करण्याच्या अफवा पसरवल्या जात असून कोणीही मला मॅनेज करू शकत नाही.” रावसाहेब दानवे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावर आता रावसाहेब दानवे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे हे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे जालन्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

जालन्यात यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. जालना भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात भाजपची मोठी ताकत आहे. रावसाहेब दानवे या मतदारसंघातून पाचवेळा निवडणूक लढवली असून पाचही वेळा ते निवडून आले आहेत. यंदा ते सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तसेच डॉ. कल्याण काळे माजी आमदार असून तेदेखील ताकदीचे उमेदवार आहेत. २००९ साली त्यांचा अवघ्या ८००० मतांनी रावसाहेब दानवेंकडून पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ सालीही त्यांनी निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा रावसाहेब दानवे विरुद्ध डॉ. कल्याण काळे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

BJP ने वॉशिंग मशीन चिन्हावर निवडणूक लढवावी, Congress प्रवक्ते Sachin Sawant यांचा हल्लाबोल

“वाघ” कोण हे ४ जूनला कळेल; Sanjay Raut यांचा विश्वजित कदमांना खोचक टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss