Saturday, July 27, 2024

Latest Posts

कालवा समितीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय, पुणेकरांची पाणीकपात टळली

मागील काही महिन्यांपासून राज्यभरात सगळीकडे काही प्रमाणात पाणी कपात केले जात आहे.

मागील काही महिन्यांपासून राज्यभरात सगळीकडे काही प्रमाणात पाणी कपात केले जात आहे. त्यातच आता पुणेकरांवर असलेलं पाणी कपातीचं संकट टाळलं आहे. कालवा समितीच्या बैठकीमध्ये पुण्यामध्ये पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कालवा समितीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांनी आज झालेल्या बैठकीमध्ये धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेतला आहे. या बैठकीनंतर पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणेकरांच्या डोक्यावर मागील काही महिन्यांपासून पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भर उन्हाळ्यात पाणी कपातीचं संकट राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहन करावे लागते. पंचवीस वर्षात सगळ्यात कमी पावसाची नोंद यंदा झाली आहे. पुण्यातील धरण क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने शेतकरी सुद्धा चिंतेत होते. मात्र तरीसुद्धा पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. यंदाच्या उन्हाळ्यात पुणेकरांना शेतीसाठी देखील पाणी मिळणार आहे. उन्हाळ्यात शेतीसाठी दोन आवर्तन सोडली जाणार आहे. पहिले आवर्तन हे 3 मार्चपासून सुरू होणार आहे. पुण्यातील शेतीसाठी ७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे.

पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणी साठा केला जातो. मात्र गेल्यावर्षी याचं तारखेला धरणामध्ये १९.२८ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी हा पाणीसाठा १६.२८ टीएमसी म्हणजे तब्बल तीन टीएमसीने कमी झाला. त्यामुळे शहराला पुढील पाच महिने पुरेल एवढ्या पाणी साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. आज पार्शवभूमीवर आज कालवा समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये पुण्यातील पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांवरचे पाणी कपातीचे संकट टाळले आहे.

हे ही वाचा:

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे मन मोठे असले पाहिजे – CM Eknath Shinde

महाराष्ट्राची लोकप्रिय कला जपण्यासाठी ‘सन मराठी’ वाहिनी घेऊन येते नवीन कार्यक्रम ‘लावणी महाराष्ट्राची’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss