Monday, May 20, 2024

Latest Posts

आपले सरकार असते तर… Aaditya Thackeray यांचे Mahayuti वर ताशेरे

शिवसेना उबाठा नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योग प्रकल्पांबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढत 'आपले सरकार असते तर हे प्रकल्प राज्याबाहेर गेले नसते,' असे वक्तव्य केले.

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti) जोरदार टीका केली. महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या उद्योग प्रकल्पांबद्दल त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत ‘आपले सरकार असते तर हे प्रकल्प राज्याबाहेर गेले नसते,’ असे वक्तव्य केले.

आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) ह्यांच्या प्रचारानिमित्त खारघर-बेलपाडा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून सुरू झालेल्या रॅलीत सहभागी होत नागरिकांना मशालीलाच मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना ते म्हणाले, “गेल्या पाच वर्षात जे सत्य बोलले त्याच्यावर गुन्हे दाखल झाले ,तुम्ही जरी पत्रकार म्हणून सत्य लिहिलंत तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. अत्यंत दुःखाची गोष्ट असून, गेले दोन वर्षांपूवी आम्ही यांचा विरोध केला होता, नुसतं महानंद नही तर अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेले, आमचा गुजरातला विरोध नाही पण महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जातात या गोष्टीला आमचा विरोध आहे, वेदांता प्रकल्प गुजरातला गेला आणि नंतर तो भारतातूनच बाहेर गेला,अपले सरकार असते तर तळेगावला हा प्रकल्प झाला असता.”

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “नशीब त्यांना महाराष्ट्र आठवला. पीयूष गोयल गेले दहा वर्षे केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईच्या हिताचं काय काम केलं, रेल्वे स्टेशनची नाव बदलण्यापलीकडे काय केलं, त्यांच्याच मतदारसंघातील लोक त्यांना विचारतात तूम्ही दुसरीकडी राहणारी लोक उत्तर मुंबईमध्ये कधी आलात का?”

भाजपवर टीका करत ते पुढे म्हणाले, “मतदानाच्या पुढील दोन टप्प्यात देखील असं चित्र असेल. कारण भाजप गेले दहा वर्षे खोट बोलत आहे, पंधरा लाख खात्यात येतील, भाजपने खालच्या पातळीचे राजकारण केलं आहे, पक्ष फाडले घर फोडले यामुळे मतदानाच्या दिवशी हे नक्की लक्षात ठेवा.”

हे ही वाचा:

पराभवाच्या भितीनेच Narendra Modi कडून… Bhalchandra Mungekar यांचे ताशेरे

दिघे साहेबांची नक्कल करून अक्कल येत नसते, ४ जूननंतर कळेल ठाणेकर कोणाच्या बाजूने?Rajan Vichare कडाडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss