Wednesday, May 22, 2024

Latest Posts

पुण्यातील भाऊसाहेब रंगारी वाडा

पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.पुण्यातील अशीच एक वास्तूं म्हणजे भाऊसाहेब रंगारी वाडा.

पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.पुण्यातील अशीच एक वास्तूं म्हणजे भाऊसाहेब रंगारी वाडा. देशाला स्वातंत्र्या मिळण्यापूर्वीची क्रांतिकारकांची हक्काची जागा म्हणजे हा वाडा. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ सगळ्यांना माहित आहे. मात्र या वाड्याचे काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला माहित आहे का? २०२२ मध्ये या वाड्याचा जीर्णोद्धार करुन लोकांसाठी खुला करण्यात आला आहे.

भाऊसाहेब रंगारी हे या वाडयात राहत नव्हते पण हा वाडा त्यांनी इंग्रजांशी लढण्याऱ्या क्रांतिकारकांना जागा मिळावी यासाठी ठेवला होता. त्याकाळी गुप्त मार्ग, भुयारी मार्ग होते. शास्त्र लपवण्याची देखील जागा त्या वाड्यात होती. २०२२ साली जीर्णोद्धार केल्यानांतर वाडा जसाच्या तसा बनवण्यात आला. आपल्या इतिहासाबद्दल पुढच्या पिढीला कळावे यासाठी हा वाडा उभारण्यात आला आहे. पूर्वीच्या काळी हा वाडा दवाखाना म्हणून ओळखला जात असे. कारण भाऊ रंगारी हे राजवैद्य होते. १८९२ साली भाऊसाहेब रंगारी आणि त्यांच्या १३ सहकार्यांनी मिळून या वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याचा निर्णाय घेतला. वाड्याचं नुतनीकरण करताना वाड्यात कोणतेही नवीन साहित्य वापरले गेले नाही आहे. वाड्यातील प्रत्येक वस्तू जशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. असं भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे यांनी सांगितलं आहे. आपल्या पिढीला या सगळ्याबद्दल कळावं यासाठी जीर्णोद्धार करण्यात आला आणि आपला वारसा, इतिहास संस्कृती कळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचंही ते सांगतात. भाऊसाहेब रंगारी यांचं मूळ नाव भाऊ लक्ष्मण जावळे असे होते. सार्वजनिक उत्सवामध्ये त्यांचे नाव खूप महत्वाचे मानले जात असे. तसेच ते राजवैद्य होते. शालूंना रंग देणे हा त्यांचा व्यवसाय होता. त्यावरून त्यांना रंगारी हे नाव पडले. शालुंवरुन त्यांचं दुकान असलेल्या बोळीला शालुकर बोळी असं नाव पडलं होतं. त्याकाळच्या क्रांतीकारी चळवळींमध्ये भाऊसाहेबांचा सक्रिय सहभाग होता.

भाऊसाहेब रंगारी गणपती हा चार हातांचा आहे. गणपतीने राक्षसाचा एक हात सोंडेत धरलेला आहे. गणपतीने आपला मोडलेला दात आयुध म्हणून हाती धरलेला आहे आणि एका हाताने राक्षसाचे केसदेखील पकडले आहेत, एखाद्या कसलेल्या मल्लाप्रमाणे ही गणेशाची मूर्ती आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहाने इथे गणेशोत्सव साजरा केला जातो आणि अनंत चतुर्थीला थेट बैलगाडीमधून या गणपतीची मिरवणूक काढण्यात येते. पुण्यातील मानाच्या गणपतीमध्ये भाऊसाहेब रंगारी या गणपतीला महत्वाचे स्थान आहे.

Latest Posts

Don't Miss