Friday, April 19, 2024

Latest Posts

पुण्यातील पूना रुग्णालयात बॉम्ब, धमकीच्या फोनने सगळीकडे खळबळ

पुणे हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते.

पुणे हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा (Pune Crime) फोन एका अज्ञात व्यक्तीला पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला गुरुवारी केला होता. त्यानंतर पुण्यात सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हा फोन गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या पोलीस नियंत्रण (Pune Bomb Squad) कक्षाला आला होता. या फोनने सगळीकडे एकच खळबळ उडाली. मात्र हा फोन आल्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

पुण्यामधील पुणे हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमाला आला होता. त्या फोननंतर सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा फोन नेमका कोणी केला? फोन करणारी व्यक्ती कोण? याचा पोलीस शोध घेत आहेत. फोन आल्यानंतर बॉम्ब शोध पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर हॉस्पिटलमधील रुग्ण आणि डॉक्टरांना तातडीने बाहेर काढण्यात आले. हॉस्पिटलमध्ये कुठे बॉम्ब ठेवला आहे का याचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने संपूर्ण हॉस्पिटल पिंजून काढले मात्र त्यांना कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर हा फोन फेक असल्याचे सांगण्यात आले. तसेच आज (२ फेब्रुवारी) पुन्हा एकदा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन शोध घेतल्यानंतर ही अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुण्यामध्ये अनेकदा अश्या घटना घडल्या आहेत. असे धमकीचे फोन बऱ्याचदा आले आहेत. पुणे स्टेशन, विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे कॉल्स नियंत्रण कक्षाला आले होते. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानक उडवून देऊ अश्या देखील धमक्या देण्यात आल्या होत्या. या अश्या वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे संपूर्ण पोलीस पथक कामाललागले आहे. त्यांच्यासोबत बॉम्बशोधक आणि नाशक पथकदेखील कामाला लागली आहेत.

Latest Posts

Don't Miss