सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याचा बहाणा करत १५ वर्षीय मुलीला दोन तरुण एका अनोळखी ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर त्या दोन तरुणांनी १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रामध्ये घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील मांजरी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणींनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन तरुणांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे दोन तरुण पीडित तरुणीचे मित्र होते. अनुराग व गणेश यांनी मुलीला फिरायला नेतो असे सांगत गाडीवर बसून मांजरी परिसरात असलेल्या नदी पात्रामध्ये नेले. त्यानंतर एकांताचा फायदा घेऊन अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे यांनी मुलीवर आळीपाळीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर ते तरुण मुलीला अनोळखी ठिकाणी सोडून निघून गेले. मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीला अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे या दोघांनी धमकी दिली होती. घडलेला सर्व प्रकार कोणाला सांगितला तर मारुन टाकेन म्हणत मुलीला धमकावले होते. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही तरुण पीडित मुलीचे मित्र होते. या दोघांवर विश्वास ठेवून मुलीने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र त्याच मित्रांनी तिचा विश्वास घात केला. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. २०२३ या वर्षात पुण्यात ३९४ मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.
हे ही वाचा:
मुंबई आयआयटीमध्ये आयोजित करण्यात आलेले प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द
‘जात बघुन मैत्री करणारा तू’….मेघा घाडगेनी केली पुष्कर जोगची कानउघजडणी