Saturday, July 27, 2024

Latest Posts

पिंपरी चिंचवड मधील वाकड भागात नवीन तयार करण्यात आलेली इमारत जमीनदोस्त

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असलेल्या एका इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असलेल्या एका इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. वाकड परिसरामध्ये असलेल्या चालू बांधकामाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. तयार करण्यात आलेल्या इमारतींमुळे अनेकांच्या जीवाला धोका असल्याने इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. महापालिकेकडून ही इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीवर JCB फिरवून जमीनदोस्त करण्यात आली आहे.

वाकडमध्ये नवीन तयार करण्यात आलेली इमारत चार नाही तर दोन पिलरवर उभी करण्यात आली होती. इमारतीच्या बांध कामासाठी चार पिलर गरजेचे असतात. सर्व इमारती चार पिलरवर बनवल्या जातात. मात्र ही इमारत दोन पिलरवर तयार करण्यात आली होती. दोन पिलरवर तळमजला आणि त्यावर तीन मजले असे बांधकाम करण्यात आले होते. पण रात्री अचानक इमारत खाली झुकल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रात्री अग्निशमन दल (Fire Brigade) आणि पोलीस प्रशासन (PCMC Police) इमारतीजवळ दाखल झाले. यामुळे संपूर्ण प[परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांच्या जीवाला या इमारतींमुळे धोका असल्याने ही इमारत पाडण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. नंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारत पाहिल्यानंतर इमारत पाडण्याचा निर्णय घेतला.

पिंपरी चिंचवडमध्ये नवीन तयार करण्यात आलेली जमीन अचानक झुकल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही इमारत सध्या जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आली. अतिरिक्त बांधकाम, चुकीच्या पद्धतीने स्ट्रक्चर उभारल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ही इमारत पुढील काळात स्थनिकांच्या जीवावर बेतणार होती. आर्किटेक, बिल्डर आणि परवानगी देण्याऱ्या अधिकाऱ्यापैकी नेमकी कोणावर आणि काय कारवाई होणार? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

हे ही वाचा:

आयारामांना राज्यसभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss