Saturday, July 27, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, AJIT PAWAR यांची ग्वाही

मराठा आरक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे यांच्या बीड मधील सभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक आश्वासन दिले आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणार आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी केली. मनोज जरांगे यांच्या सभेविषयी बोलताना अजित पवार या म्हणाले की, कोणी काही मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकारला नियमांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल, अशाच गोष्टी कराव्या लागत असतात. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिलेल्या आरक्षण टिकले नाही किंवा फडणवीस यांनी अभ्यास करून दिलेले आरक्षण टिकले पण ते पुढे हाय कोर्टात टिकू शकले नाही आणि आता तिसऱ्यांदा आरक्षण देताना टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा मानस असणार आहे.

राज्यामध्ये निर्माण झालेल्या कांद्याचा प्रश्न किंवा इथेनॉलचा प्रश्न त्यासोबतच दूध दराचा प्रश्न यावर अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात होते. अमित शहा यांचे राज्यसभा आणि लोकसभेत काम सुरू आहे त्यामुळे ते भेटू शकणार नाहीत. पण अचानक निरोप दिला तर आम्ही आमचे दौरे रद्द करून अमित शहा यांना भेटण्यासाठी जाणार आहोत अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. तसेच अजूनही मला राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण आले नाही उद्घाटनाला बोलावले तर जाण्याचा विचार करेन सर्वधर्म समभाव मानणारे आम्ही आहोत पण मी सकाळी दगडूशेठ इथे आरती केली आहे पण त्यानंतर जर मला राम मंदिर उद्घाटनासाठी आमंत्रण आलं तर मी नक्कीच जाणार अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

हे ही वाचा:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कार्यक्रमात

पुण्यात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ, हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss