हवामान खात्याने वर्तवली पावसाची शक्यता: पुढील २ दिवस पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा

हवामान खात्याने वर्तवली पावसाची शक्यता: पुढील २ दिवस पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा

एप्रिल (April) चा महिना आणि प्रचंड गर्मी राज्यातील सर्व शहरांमध्ये जाणवत आहे. त्यात पुण्यातील प्रचंड उकाड्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट ही जाणवत आहे. पुण्यातील तापमान जवळजवळ ३९ अशांऐवढं दिसून आलेलं आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पुण्यात दमट वातावरण दिसले असून हवामान खात्याने पुढील दोन दिवसात पुण्यामध्ये पावसाची शक्यता दर्शवली आहे. मे महिन्यात पुण्यातील तापमान अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. मागील १३ वर्षात सर्वाधिक तापमान ४३ अंश एवढे २०१९ साली नोंद केले होते. यावेळी हे तापमान ३९ अंशांपुढे गेले नसल्याने पुणेकरांना जरासा दिलासा मिळाला आहे. परंतु, मे महिन्यात मात्र उकाडा पुणेकरांनाजाणवणार असल्याचं दिसून येत आहे.

जेव्हा कमाल तापमान ४३ ते ४५ अंश एवढे असते तेव्हा उष्णतेची लाट आल्याचे मानले जाते, असे हवामान खाते सांगते. पुण्यात सध्यातरी अशी लाट नाही असेही खात्याने सांगितले आहे. अरबी समुद्रातले आद्रतायुक्त वारे गुजरातकडून महाराष्ट्र आणि पुण्याकडे वाहत असून यामुळे शहरात दमट वातावरण निर्माण झाले आहे. असे असूनही हे वारे आरोग्यासाठी चांगले नसून डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. म्हणून अश्या वेळी नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.

पूर्ण देशभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून राज्यात पुढील २४ तासात विविध ठिकाणी पावसाचे आगमन दिसून येईल. पुढील ४ दिवस पावसाची शक्यता राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने लावला आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, जालना, परभणी, बीड या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या ही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

हे ही वाचा:

Dr. Babasaheb Ambedkar: The Untold Truth चित्रपटाचे होणार प्रसारण
 
AMIT SHAH यांच्या गाडीत अस्सल BJP वाले किती राहिलेत? UDDHAV THACKERAY यांचा सवाल
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version