Thursday, May 16, 2024

Latest Posts

AMIT SHAH यांच्या गाडीत अस्सल BJP वाले किती राहिलेत? UDDHAV THACKERAY यांचा सवाल

पालघर येथील बोईसर या ठिकाणावरील आंबट-गोड मैदान येथे महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित केले. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, रावण विद्वान होता, पण त्याच्या अहंकाराने घात केला. परिवार म्हणजे फक्त सुटाबुटातील मित्र. तुम्ही माझा पक्ष चोरला, माझे चिन्ह चोरले. माझा वडील पण चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. बाहेरून येऊन तुम्ही नकली शिवसेना उभी करताय, तुम्ही बाहेरचे. शिवसेनेवर हक्क गाजवताय, असे म्हणत अबकी बार भाजप तडीपार असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

अमित शाह यांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती राहिलेत? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला. ग्रामीण भागातील जनता आता म्हणतेय की, आम्हाला भाजप नकोय, आम्ही भाजपला मत देणार नाही. माझं आव्हान आहे की मला संपवून दाखवा. असे आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले.

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss