Wednesday, April 24, 2024

Latest Posts

निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेची कारवाई

भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या मालमत्तेवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे.

भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या मालमत्तेवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे. पुण्यामध्ये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पुण्यामधील डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने ही जागा पालिकेकडून सील करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मालमत्ता थकबाकी प्रकरणी ही मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यावर ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थबकी लावण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून कर थकीत असलेल्या वेगवेगळ्या शहरात कारवाई केली जात आहे.

महापालिकेचे पैसे थकले असतील म्हणून त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यात काही गैर नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर वेगळी बातमी आली असती. आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार असल्याचे,नितेश राणे म्हणाले. पुणे महापालिकेकडून मागील काही दिवसांपासून पुण्यात वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहे.ज्या ठिकाणी कोट्यावधी कर थकीत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कारवाई करण्याआधी नोटिफिकेशन पाठवण्यात येते आणि त्यानंतर कारवाई केली जाते. पुण्यात डेक्कन विभागात एक मोठा मॉल आहे.या मॉलमध्ये अनेक दुकानं भाड्याने देण्यात आली आहेत. त्याठिकाणीच पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहचले आहेत.

पुण्यातील डेक्कन कॉर्नर येथे निलेश राणे यांचे एका दुकान आहे. या तिसऱ्या मजल्यावरील दुकानाची थकबाकी होती. या मॉलची किंमत ५कोटी ६० लाख रुपये आहे. थकबाकीचा पुणे महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला जात होता. त्यांना काही दिवसांआधी नोटीस देखील पाठवण्यात आली होती. तरीही त्यांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट राणेंच्या मालमत्तेवर कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून अश्या अनेक कारवाया केल्या आहेत.

हे ही वाचा:

राज्यस्तरीय मेळाव्याची तारीख बदलली, ‘या’ दिवशी होणार नमो महारोजगार मेळावा

रविंद्र वायकरांवर पक्ष सोडायला कोणी दबाव आणला? सेनानेत्याचा Political Encounter! Ravindra Waikar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss