Saturday, March 2, 2024

Latest Posts

PUNE: पोलिसांनी मुलं आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ फुलवली

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  (RUPALI CHAKANKAR) यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पुणे पोलिसांचे अभिनंदन केले आहे. आयोगाची अध्यक्ष झाल्यानंतर बालविवाह रोखणे आणि हरवलेल्या मुली, महिला यांचा शोध घेणे या दोन गोष्टी मी अग्रक्रमाने घेतल्या होत्या, असे त्यांनी शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, मुलींचा शोध लावण्याची कामगिरी पार पाडल्याबद्दल पुणे पोलिसांचे कौतुक त्यांनी केले आहे.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? 

आयोगाचे यश…राज्यभरातून मिसिंग होणाऱ्या मुली, महिला यांचा तपास लागावा यासाठी आयोगाच्या माध्यमांतून पाठपुरावा आम्ही करत आहोत. जर या मुली किंवा महिला परदेशी गेल्या असे लक्षात आल्यास राष्ट्रीय महिला आयोग, सबंधित देशाचे भारतीय दूतावास यांच्याशी आम्ही संपर्क करतो. परदेशात म्हणजेच ओमान आणि मस्कत मधून आतापर्यंत २३ महिला परत आल्या असून अजून ६४ महिला लवकरच मायदेशी येणार आहेत. तर राज्याच्या मिसिंग प्रकारांसाठी मी वेळोवेळी पोलीस महासंचालक, त्या त्या शहराचे पोलीस आयुक्त किंवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे वैयक्तिक पाठपुरावा केलेला आहे. वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांना यश येते आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातून हरवलेल्या मुलींचा शोध लावण्यासाठी पुणे पोलिसांकडे पाठपुरावा केला. मिसींग महिलांचा विषय गांभीर्याने घेत पुणे पोलीसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ ला चांगले यश मिळाले आहे. गेल्या २ वर्षात दाखल मिसिंग तक्रारींमधून ५५६ महिला तसेच ३४ बालके यांचा शोध घेत त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाशी जोडलं आहे. पुणे पोलिसांनी या तत्पर आणि अथक प्रयत्नांनी या सर्व महिला, मुलं आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ फुलवली आहे. पुणे पोलिसांचे अभिनंदन.

हे ही वाचा:

डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल

MAHARASTRA: अपघातांचे सत्र सुरूच, पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss