Sunday, March 3, 2024

Latest Posts

मराठा आरक्षण प्रकरणातील ऋषिकेश बेदरेला पुन्हा एकदा अटक

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात अनेक वाद सुरु आहेत.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यात अनेक वाद सुरु आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली येथील सराटी गावात आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांवर उपोषणास्थळी दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी आता आरोपी ऋषिकेश बेदरेला पुन्हाएकदा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला न्यालयात हजर केले. त्यानंतर त्याला २ डिसेंबरपर्यंत न्यालयानी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर मनोज जरांगे काय प्रतिक्रिया देणार हे महत्वाचे असणार आहे.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि आंतरवाली सराटीतील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला जालना पोलिसांकडून पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. गावठी पिस्टल प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. न्यायाल्याकडून २ डिसेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भारतीय हत्यार बंदी कायद्यानव्ये पोलीसांकडून ही कारवाई झाली असल्याची माहिती जालना पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Paragliding चा आनंद लुटायचा आहे? भारतातील ही ५ ठिकाणे आहेत सर्वोत्तम…

नौदलात अग्निवीर प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss