Saturday, July 27, 2024

Latest Posts

मराठवाड्यातील कुणबी नोंदीची आकडेवारी आली समोर, कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे २४ डिसेंबर नंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे २४ डिसेंबर नंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. या मागणीसाठी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीने (Shinde Committee) आपला दुसरा अहवाल देखील सरकारकडे सादर आहे. आत्तापर्यंत मराठावाड्यात खूप कमी प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत २ कोटी दस्तऐवज तपासण्यात आले असून, ज्यातून आतापर्यंत एकूण २८ हजार ८६२ मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्र १ नोव्हेंबरपासून आजवर देण्यात आली आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेने आजवर २ कोटी पुरावे शोधून, सुमारे २८ हजार ८६२ मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे साडेपाच लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय प्रशासन करीत आहे. तसेच, सध्या समितीला नोंदी पाठविण्याचे काम संपले आहे.

संभाजीनगर २३३७
जालना ३३१८
परभणी २८९१
हिंगोली ३५१५
नांदेड १२०४
बीड १३१२८
लातूर ९०१
धाराशिव १५७०
एकूण : १८८६२

मराठवाड्यात आत्तापर्यंत ३ हजार ४६२ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. आठ जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने शोधलेल्या पुराव्याच्या आधारे मराठवाड्यातील सुमारे साडेपाच लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय प्रशासन करत आहे. एका पुराव्याच्या आधारे सुमारे २० जणांना वंशावळप्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल. तसेच रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरूच राहणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. मनो जरांगे यांनी मराठवाड्यातून मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात केली आहे. मात्र मराठवाड्यात आत्तापर्यंत २८ हजार ८६२ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा नोंदी शोधात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी याची दखल घेऊन मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरूच ठेवावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

POLITICS: मुंबईत आम्ही ४०० किमीचे रस्ते बनवू हे मजाक आहे का?, JITENDRA AWHAD यांचा सवाल

POLITICS: मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss