Sunday, May 19, 2024

Latest Posts

शिंदे आणि शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई करू नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

मुंबई: १६ आमदारांच्या याचिकेबाबत शिवसेनेकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती. आज ११ जुलै रोजी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे. आज कोर्टात शिवसेनेच्या याचिकेवर एक महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे. सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई करू नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या १६ आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे.
त्यामुळे आज नेमकं काय होतंय आणि सुनावणी पुढे ढकलली जाणार का हे पहावं लागेल. याचिकेवर आजच निकाल दिला जाणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे. सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको असं कोर्टाने म्हटलं आहे.
सर न्यायाधीशांनी असे सांगितले की, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्या १६ आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेऊ. त्यामुळे आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा आता कोर्टाकडे असणार आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना त्याबाबत कुठला ही अधिकार यापुढे नसेल. कपिल सिब्बल यांनी आजच याबाबत सुनावणी करण्यात यावी, १६ आमदार आणि स्थापन झालेलं सरकार हे संविधानाला मानून नाहीये. त्यामुळे कोर्टाने एकत्रित याचिकांवर आजच सुनावणी घ्यावी अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे.
कपिल सिब्बल यांच्या मागणीवर कोर्टातून कुठलाच निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोर्टातील सुनावणीचा निकाल लवकरात लवकर देण्यात येईल असं सर न्यायाधीशांकडून सांगण्यात आले आहे. कोर्टाने निश्चित तारीख सांगितलेली नाही परंतू त्या १६ आमदारांवर तूर्तास कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे पुढे काय घडतं हे पहावं लागेल. शिवसेनेतून शिंदे गटावर याचिका दाखल करण्यात आल्यावर लगेच शिंदे गटाने ही शिवसेने विरुद्ध याचिका दाखल केली होती. तेव्हा सुट्टीचा कालावधी सुरू होता. आजपासून कोर्टाच्या नियमित कामकाजाला सुरूवात झालेली आहे.

Latest Posts

Don't Miss