Saturday, July 27, 2024

Latest Posts

ठाण्यातील कासारवडवली आनंदनगरमध्ये तरुणाची तलवारीने वार करून हत्या

ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील कासारवडवली (Kasarvadvali) आनंदनगरमध्ये (AnandNagar) तरूणाची तलवारीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेमध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या करून हल्लेखोर पळून गेले. हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. रात्री उशिरा पर्यंत पोलीस पंचनामा करण्याचे काम करत होते.

ठाण्याच्या कासारवडवली आनंदनगरमध्ये भर रस्त्यात तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. रात्री ९.३० ते १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सतीश पाटील असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र हत्ये मागेच कारण अजून स्पष्ट झाले नाही. हत्या करणाऱ्या आरोपींची नावेही अद्याप समोर आलेली नाही. सतीश पाटीलचा इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय होता. पाटील कासरवडवली आनंदनगर परिसरात काही कामानिमित्ताने गेले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पाटील त्यांच्या कारमधून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन तरूणांनी त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी घालत थांबवले. त्यानंतर गाडीचा दरवाजा उघडून त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. वार केल्यानंतर सतीश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. वार करून हल्लेखोर लगेच पळून गेले. परिसरातील नागरिकांना काही कळण्याअगोदर धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात काही वेळासाठी गर्दी झाली होती.

भिवंडी (Bhiwandi) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तर, या युवकाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडण्यात आले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत दोघांना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून त्यांनी ही हत्या केली असल्याचे समोर येत आहे. योगेश रवि शर्मा (वय १६वर्ष) असे मयत अल्पवयीन तरुणाचे नाव आहे.

हे ही वाचा:

Christmas हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?

काँग्रेसचा सोमवारी ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss