Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Central Railway चा खोळंबा, Thane स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी १३ मे रोजी मध्य रेल्वेचे (Central Railway) वेळापत्रक कोलमडल्याचे पाहायला मिळाले. मध्य रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावल्या. कसारा (Kasara) स्थानकावरून निघालेली सीएसएमटी (CSMT) कडे जाणारी ८.३० ची ट्रेन पंधरा ते वीस मिनिटे मुंब्रा (Mumbra) ते कळवा (Kalwa) स्थानकादरम्यान थांबली. त्यांनतर ही ट्रेन ३० ते ३५ मिनिटांपर्यंत हा कळवा ते ठाणे स्थानकादरम्यान थांबली. ऐन गर्दीच्या वेळी सकाळीच रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. सकाळच्या वेळी ऑफिसला पोहचायच्या घाईमुळे ऐनवेळी लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडल्याने काही प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालण्याचा निर्णय घेतला.

ठाणे (Thane) स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. मुंबई उपनगरीय रेलवे मार्गावरील कल्याण (Kalyan) ते कुर्ला (Kurla) दरम्यान यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने अनेकांनी भर उन्हात ट्रॅकवरून चालण्याचा निर्णय घेत ठाणे स्थानक गाठले. ठाणे स्थानकात सकाळी ९. ३० वाजल्यापासून १०. ३० वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणेचे काम सुरु होते. अचानक झालेल्या सिग्नल बिघाडामुळे प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

मुंबई विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे ठाण्यातील बिघाड पूर्ववत

ऐन गर्दीची वेळ, त्यात ऑफिसला पोहचण्याची घाई आणि त्यात ट्रेन मध्येच थांबली, मध्य रेल्वेचा हा कोलमडा कधी सुरळीत होणार? असा सवाल प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वे (Central Railway) च्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत माहिती दिली होती की, ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाडामुळे कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे कामकाज पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतर सिग्नलचे काम पूर्ण झाल्यावर मध्य रेल्वेकडून ट्विट करण्यात आले आहे की, मुंबई विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे ठाण्यातील बिघाड १०. १५ वाजता पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस (Mail Express) गाड्या सुरळीत झाल्या आहेत.

हे ही वाचा:

loksabha election 4th phase voting: पहिल्या दोन तासात राज्यात ६.४५ टक्के मतदान

“मतांच्या माध्यमातून जनतेचे….”; वाढदिवसाच्या दिवशी Raksha khadse यांनी बजावला मतदानाचा हक्क

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss