Monday, May 20, 2024

Latest Posts

दत्ता दळवींना ५ अटींवर मुलुंड कोर्टाकडून जामीन मंजूर

माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलूंड कोर्टाकडून दत्ता दळवींना जामीन मंजूर करण्यात आला आहे

माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलूंड कोर्टाकडून दत्ता दळवींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. आरोपी वरिष्ठ नागरिक असून त्यांना काही आजार देखील आहेत, तसेच ते पळून जाण्याची भीती नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी दत्ता दळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील अवमानकारक जाहीर वक्तव्य प्रकरण दत्ता दळवींना भोवलं होतं. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. दत्ता दळवी हे शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक. शिवसेनेतील फुटीनंतर दळवींनी ठाकरेंना आपला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्र्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता दळवी चर्चेत आले होते. दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि १५३ (A), १५३ (B), १५३(A) (१) सी,२९४, ५०४,५०५ (१) (C) कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली. मात्र आज जामीन घेत असताना देखील सूडबुद्धीनं विलंब केला जातोय असा आक्षेप ठाकरे गटाकडून सातत्यानं घेतला जात होता. आज अखेर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

कोर्टात काय घडलं?
गेल्या २ दिवसांपासून दत्ता दळवी कारागृहात होते. जामीन मंजूर झाल्यानंतर आजच दत्ता दळवींची ठाणे कारागृहातून सुटका होणार आहे. कोणताही समाज आणि समूहा विरोधात, दत्ता दळवी यांनी अवमानकारक वक्तव्य न केल्याचं, कोर्टानं निरीक्षण नोंदवलं. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत हेट स्पीच केल्याचीही नोंद कोर्टानं घेतली आहे. ४१ A ची नोटिस न देता, दत्ता दळवी यांनी अटक केल्याचा, दळवी यांच्या वकिलांचा दाव्याची कोर्टानं नोंद घेतली. पोलिसांनी सेक्शन १५३ गैरलागू केल्याचा दावा दळवी यांच्या वकिलांनी कोर्टात केला. या स्टेजवर मान्य होऊ शकत नाही, असं कोर्टानं निरिक्षण नोंदवलं. त्यानंतर चंदा कोचर केसचा रेफरन्स दळवी यांच्या वकिलांनी दिला होता. आरोपी दत्ता दळवी यांचं वय आणि मेडिकल हिस्ट्रीही कोर्टानं लक्षात घेतली. दळवी यांचे मेडिकल ग्राउंड पुरावे कोर्टानं मान्य केले. काही अटी आणि शर्ती पाळण बंधनकारक असल्याचं सांगत दळवींना कोर्टानं जामीन मंजूर केला.

कोणत्या अटी-शर्थींवर दत्ता दळवींना जामीन मंजूर?

प्रकरणाचा तपास संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू
मुख्यमत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई
कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई
पोलिसांना सहकार्य करण बंधनकारक
कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक

कोण आहेत हे दत्ता दळवी? काय आहेत त्यांच्यावर आरोप
बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी दत्ता दळवींची ओळख. दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक ७ च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच २००५ ते २००७ या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केलं. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे.

२०१८ साली दत्ता दळवींनी आपल्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेवर दावा सांगितला. त्या काळात दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांची निष्ठा कायम ठेवली. आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच शिवी दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

LIFESTYLE: थंडीत आवळ्याचे सेवन करा, आणि सुदृढ राहा

MUMBAI: गिरगावात पहिला क्यूआर कोड चौक, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss