Saturday, May 18, 2024

Latest Posts

मुंबईसह मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा

रात्रीपासूनच उल्हासनगर (Ulhasnagar), अंबरनाथ (Ambernath) आणि बदलापूरमध्ये (Badlapur) मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुंबईत मध्य रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. अधून-मधून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी साचलं आहे. तसेच यामुळे काही भागात वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला आहे. तसेच रात्रीपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तर मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे जिल्ह्यात देखील सकाळपासूच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वंदना आणि स्टेशन रोड परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. ठाण्यात मागील २४ तासात ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे महापालिकेच्या नोंदीनुसार, पालिका परिसरात ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहणार आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

रात्रीपासूनच उल्हासनगर (Ulhasnagar), अंबरनाथ (Ambernath) आणि बदलापूरमध्ये (Badlapur) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. अखेर चांगला पाऊस सुरु झाला आहे. तसेच हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस

हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss