Thursday, February 29, 2024

Latest Posts

कल्याण शहरात भर रस्त्यामध्ये विद्यार्थ्याचे अपहरण, चाकूचा धाक दाखवून पैसे लुटले

मागील काही दिवसांपासून कल्याण शहरात लहान मुलांच्या अपहरणाचे अनेक प्रकार घडत आहेत.

मागील काही दिवसांपासून कल्याण शहरात लहान मुलांच्या अपहरणाचे अनेक प्रकार घडत आहेत. कल्याणमध्ये कधी कोयता गँगची दहशत तर बिझनेसकडून बायको-मुलाची हत्या यासर्वमुळे कल्याण शहर हादरून गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण शहर चर्चेत आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे.अशीच एक घटना आता कल्याणमध्ये घडली आहे.कोळसेवाडी परिसरात एका पान टपरी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कल्याण पश्चिम येथे भररस्त्यामध्ये एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढाच नसून त्याला बेदम मारहाण देखील करण्यात आली आणि चाकूचा धाक दाखवण्यात आला. चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून हजारो रुपयेही लुटले. नीरज भोलानाथ यादव असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा अंबरनाथमध्ये राहणार रहिवासी आहे. पोलिसांना या घटनेचे माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

नीरज हा मूळचा अंबरनाथचा रहिवासी असून तो कॉलेजसाठी कल्याणमध्ये येतो. मंगळवारी रात्रीच्या सुमारासा तो घरी जात असताना त्याला शहाड जकात नाका येथे तो रिक्षाची वाट बघत होता. तेवढ्यात तिथे ३ आरोपी गेले आणि त्याला जबरदस्तीने नीरजला त्यांच्या बाईकवर बसवले. त्यानंतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. नंतर त्याला तीनही आरोपींनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या जवळ असलेले सर्व पैसे आणि डेबिट कार्ड ताब्यात घेऊन जवळच्याचा एटीएममधून पैसे काढले. तसेच त्यांनी गळ्यातील सोन्याची चेन आणि पाकिटातील रोख रक्कम देखील हिसकावून घेतली. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. हल्लेखोरांच्या ताब्यातून सुटल्यानंतर कसेबसे महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठले. घडलेला सर्व प्रकार सांगून तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

IPL च्या शेवटच्या सिझनमध्ये शुभमनच्या बॅटने केल्या सर्वाधिक धावा, यावेळी कोण बनू शकतो नंबर १…

इक्बाल मिर्चीचा पार्टनर प्रफुल्ल पटेल व भ्रष्टाचारी अजित पवार फडणवीसांना कसे चालतात?, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss