Tuesday, May 21, 2024

Latest Posts

कार्यकर्त्यांची नाराजी दूर करेन असा Ganesh Naik यांचा शब्द, Naresh Mhaske यांचे वक्तव्य

ठाणे लोकसभा मतदारसंघातून (Thane Loksabha Constituency) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून शिवसेनेचे (Shivsena) नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांचे नाव घोषित करण्यात आले. त्यानंतर ठाणे आणि नवी मुंबईतील भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे काल (गुरुवार, २ मे) ठाणे भाजप कार्यालयात महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत नरेश म्हस्के यांच्यासह भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नरेश म्हस्के यांनी ‘ठाणे लोकसभेमध्ये प्रचाराची दिशा ठरवायची यासंदर्भात आजची बैठक झाली. या बैठकीत चांगले निर्णय घेण्यात आले. उद्या (शुक्रवार, ३ मे) पुन्हा चार वाजता या कार्यालयात आम्ही बैठक घेतोय,” असे सांगितले.

नरेश म्हस्के यावेळी म्हणाले, “माहितीचा उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. शिवसेनेच्या वतीने आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांचा आशीर्वाद घेतला. गणेश नाईक यांना भेटायला नवी मुंबई या ठिकाणी गेलो. माझ्यासोबत रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक होते. नाईक साहेबांनी मला आशीर्वाद दिला त्यांनी माझं स्वागत केलं. ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर यांनी मला बोलावलं माझं स्वागत केलं आणि कशाप्रकारे प्रचाराचा प्लॅनिंग करायचं कशाप्रकारे या ठाणे लोकसभेमध्ये प्रचाराची दिशा ठरवायची यासंदर्भात आजची बैठक झाली. या बैठकीत चांगले निर्णय घेण्यात आले. उद्या पुन्हा चार वाजता या कार्यालयात आम्ही बैठक घेतोय.” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “शिवसेना भाजप असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल महायुतीतर्फे मला उमेदवारी जाहीर झालेली आहे. संजीव नाईक हे इच्छुक होते त्यांना उमेदवारी नाही मिळाली म्हणून काही कार्यकर्ते नाराज असतील. युती आहे युतीमध्ये एका पक्षाला उमेदवारी दिली जाते तेव्हा दुसऱ्या पक्षाची कार्यकर्ते नाराज होतात. आमच्यामध्ये सुद्धा भिवंडी मध्ये आमचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते पालघर मध्ये अगदी ईशान्य मुंबईला देखील आमचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होते. नाराजी असणार स्वाभाविक आहे पण कार्यकर्त्यांची नाराजी दूर करेन असा शब्द नाईक साहेबांनी मला स्वतः दिलेला आहे निवडणुकी संदर्भात जे काही सहकार्य आहे ते मी करणार आणि प्रचंड बहुमताने आणि नरेंद्र मोदी यांची हॅट्रिक करण्याकरता असा शब्द नाईक साहेबांनी दिलेला आहे “

“प्रचाराचा नियोजन कसं करायचं यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. उमेदवाराचे प्रस्तावक म्हणून आमदार संजय केळकर हे राहणार आहेत. आमदार गीता जैन, आमदार मंदा मात्रे या स्वतः फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस देखील फॉर्म भरण्यासाठी येऊ शकतात. मला जर फॉर्म भरण्यासाठी यायला नाही जमलं तर ठाणे लोकसभेसाठी दोन सभा देईन असा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

BJP ने वॉशिंग मशीन चिन्हावर निवडणूक लढवावी, Congress प्रवक्ते Sachin Sawant यांचा हल्लाबोल

नाशिककर आणि दिंडोरीकर Mahayuti च्या कामाची पोचपावती देतील, CM Eknath Shinde यांचा विश्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss