Monday, May 20, 2024

Latest Posts

NAVI MUMBAI: सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले, गुन्हे शाखेकडून सावधानतेचा इशारा

सायबर गुन्ह्याशी संबधित एनसीसीआरपी पोर्टलवर या ११ महिन्यांमध्ये पाच हजार ९०८ तक्रारी आल्या असून यात तब्बल ५८.६० कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. 

सायबर गुन्ह्यामध्ये सध्या बऱ्याच प्रमाणात वाढ होतांना दिसून येत आहे. असाच एक प्रकार नवी मुंबई येथे घडला आहे. नवी मुंबई शहरात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लुबाडण्यासाठी स्मार्ट मार्गाचा वापरल्याचे समोर आले आहे. अर्धवेळ नोकरी, जास्त परताव्याचे आमिष दाखवून किंवा सेक्स्टॉर्शन, मनी लाँडरिंगची भिती दाखवून लोकांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागच्या ११ महिन्यांत सायबर फसवणुकीचे ३२३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात तब्बल ४१ कोटी ४० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या अनेकजण ऑनलाईन शॉपिंगच्य विश्वात हरवले आहेत. प्रत्येक काम ऑनलाईन करण्याकडे प्रत्येकाचा कल दिसून येत आहे. मात्र त्याबाबत पुरेशी जागरुकता नसल्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे सध्या घडत असलेल्या विविध गुन्ह्यांवरून दिसून येते.

यासोबतच, वीजबिले थकल्याच्या, बँकेचे केवायसी करण्याच्या बहाण्याने, ऑनलाइन खरेदी करताना तसेच युट्यूबला लाइक करण्याचे टास्क देऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे. यात सुरुवातीला काही पैसे मिळवून देत विश्वास संपादन करून, नंतर लाखो रुपये उकळले जात आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत सायबर फसवणूक, सोशल मीडियाशी संबधित एकूण ३२३ गुन्हे दाखल झाले असून या यामध्ये तब्बल ४१ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यातील अवघे ४९ गुन्हे उघडकीस आले असून यातील १५ आरोपींना अटक करण्यात नवी मुंबईच्या सायबर पोलिसांना यश आले आहे.

‘सोशल मीडियावरील अर्धवेळ नोकरीच्या जाहिरातींची खात्री करा, त्यांना वैयक्तिक माहिती देऊ नका, त्यांच्यासोबत अर्थिक व्यवहार करू नका, फसवणुकीचे प्रकार आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांना संपर्क साधा,’ असे आवाहन नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी केले आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास करण्यासाठी गेल्या ऑगस्टमध्ये नवी मुंबई सायबर पोलिस ठाणे नव्याने सुरू करण्यात आले आहे. या तीन महिन्यांमध्ये ३४ गुन्हे दाखल झाले असून यात तब्बल १७.८८ कोटींची फसवणूक झाली आहे. मात्र सायबर पोलिसांनी तांत्रिक व इतर माध्यमांतून तपास करून सहा गुन्हे उघडकीस आणून १५ आरोपींना जेरबंद केले आहे. सायबर गुन्ह्याशी संबधित एनसीसीआरपी पोर्टलवर या ११ महिन्यांमध्ये पाच हजार ९०८ तक्रारी आल्या असून यात तब्बल ५८.६० कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

हे ही वाचा:

CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स म्हणजेच दिनेश फडणीस यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pankaja Munde – Devendra Fadnavis एकत्र येणार एकाच व्यासपीठावर ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss