Avinash Jadhav यांच्याविरोधात खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

Avinash Jadhav यांच्याविरोधात खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्याविरुद्ध खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (शुक्रवार, ३ मे) लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अविनाश जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मारहाणीच्या व्हिडीओज समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी अविनाश जाधव आणि त्यांचे सहकारी वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर याला झवेरी बाजार येथील दुकानात हिशोबाची बोलावले होते. यावेळी अविनाश जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलिसांसमोरच जैन यांचा मुलगा स्वामील याला मारहाण केली. तसेच त्यांना धमकावत उचलून नेण्याची धमकी देऊन पाच कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.

यावर अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “एका व्यक्तीने फोन कारून मला आणि माझ्या पत्नीला डांबून ठेवलय, असं सांगितलं होत. त्यानंतर मी मदती साठी पोलिसांना घेऊन तिथे गेलो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुडभावनेने माझ्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

अविनाश जाधवांवर कोणता गुन्हा दाखल?

पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यावर तक्रार डंखल करण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण केली. तसेच, उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत केला गेला आहे. दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीनुसार अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात भादंवि कलाम ३८५, १४३, १४७, ३२३, १२० ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी क्रॉस केस देखील दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे

माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही, Kalyan Kale यांची Raosaheb Danve यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version