डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. डोंबिवलीतील राजूनगर खाडीत एका अडीच वर्षीय लहान मुलगी आणि तिच्या वडील बुडाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड यांनी शोध मोहीम सुरु केली आहे. फायर ब्रिगेडचे दोन कर्मचारी या मुलीचा आणि वडिलांचा शोध घेत आहेत. राजूनगर परिसरातील खाडी भागात एक वडील आपल्या लहान मुलीला घेऊन खाडी परिसरात गेले होते. ती मुलगी तिथे खेळत होते. खेळात असताना ती खाडीच्या किनाऱ्यावर गेली. त्यानंतर ती अचानक खाडीमध्ये बुडाली. नंतर तिला वाचवण्यासाठी तिचे वडील पाण्यात गेले. त्यानंतर त्यांनी पाण्यात उडी मारली. त्यांनी पाण्यात उडी मारल्यानंतर चांद शेख नावाचा एक तरुण त्या दोघांना वाचवण्यासाठी गेला. मात्र तो तिथे पोचेपर्यंत दोघंही बुडाले होते. काही किलोमीटर अंतरावर त्याने आजोबांचा हात पहिला पण तो त्यांना वाचवू शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास म्हात्रे हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे आणि त्यांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. तसेच घटना स्थळी शोध मोहीम सुरु आहे. हे दोघे कोण होते कुठून आले होते याची कोणालाही माहिती नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारीला आझाद मैदानात मनोज जरांगेंच आमरण उपोषण
बिग बॉसच्या घरात विकी जैनने अंकिता लोखंडेवर उचलला हात,व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी करतायत ट्रोल